एक्स्प्लोर

Tujhya Aaila Upcoming Marathi Movie: 'तुझ्या आयला'मधील बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारं 'बागड बागड...' गाणं रिलीज; ऐकलंत?

Tujhya Aaila Upcoming Marathi Movie: चित्रपटाच्या कथेला गती प्रदान करण्यासाठी गाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. नुकतेच प्रदर्शित झालेले 'तुझ्या आयला' या चित्रपटातील 'बागड बागड...' हे गाणेही कथानकात अतिशय महत्त्वाच्या वळणावर येते.

Tujhya Aaila Upcoming Marathi Movie: नेहमी प्रवाहापेक्षा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या चित्रपटांद्वारे विविधांगी विषय रसिकांसमोर सादर करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके यांचे दिग्दर्शन तसेच पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत निर्मिती या चित्रपटाला लाभली आहे. या चित्रपटातील 'बागड बागड...' हे महत्त्वपूर्ण गाणे रसिक दरबारी सादर झाले आहे. अर्थपूर्ण शब्दरचना, सुमधूर संगीत, लयबद्ध चाल आणि मनाला भिडणारे सूर यांचा संगम या गाण्यात जाणवतो. 'तुझ्या आयला' हा चित्रपट 25 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या कथेला गती प्रदान करण्यासाठी गाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. नुकतेच प्रदर्शित झालेले 'तुझ्या आयला' या चित्रपटातील 'बागड बागड...' हे गाणेही कथानकात अतिशय महत्त्वाच्या वळणावर येते. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी गायलेले 'बागड बागड...' हे गाणे गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून आकाराला आले आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे संगीतकार वरुण लिखते यांनी या गाण्याला संगीतसाज चढवला आहे. 'बागड बागड...' हे गाणे झी म्युझिक अंतर्गत सादर करण्यात आले आहे.

किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाचा ठाव यात घेण्यात आला आहे. 'जिथं जिथं गेलास तू, उमटला तुझा ठसा...' असा मुखडा असलेल्या या गाण्यात शालेय जीवनातील खेळ, धमाल, मजा, मस्ती, दंगा, भटकंती, भांडणे, हाणामाऱ्या, मैत्री, दुरावा, आपलेपणा यांची झलक पाहायला मिळते. थकल्या-भागल्या मनाला उभारी देण्याचे काम करणारे हे गाणे 'तुझ्या आयला'च्या कथानकात एका अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी येते आणि चित्रपटाला गती प्रदान करते. प्रदर्शित करण्यात आलेल्या गाण्यामध्ये 'तुझ्या आयला' या खेळाची झलकही पाहायला मिळते. वास्तवदर्शी लोकेशनवर नैसर्गिक प्रकाशात चित्रीत केलेले हे गाणे नेत्रसुखद वाटते. 'उनाड दुपारी बागड बागड...' हे या गाण्याची पंचलाईन आहे. या गाण्यातील हे चार अतिशय महत्त्वाचे शब्द प्रत्येकाला बालपणी दुपारच्या भर उन्हात केलेल्या भटकंतीची आठवण करून देणारे आहेत. अवधूत गुप्ते यांनी अतिशय ठसकेबाज तालामध्ये या गाण्यातील शब्दांना न्याय दिला आहे. वरुण लिखते यांच्या सुमधूर संगीताची किनार लाभल्याने हे गाणे अधिकच श्रवणीय बनले आहे.

पॅनोरमा स्टुडिओजच्या वतीने कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि मुरलीधर छतवानी, कल्ट डिजिटलच्या वतीने सुनील जैन, आदित्य जोशी, तर प्रकाश फिल्म्सच्या वतीने राजेश सिंह यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुशांत वेंगुर्लेकर, मोहित अरोरा आणि मेघना प्रमाणिक सहनिर्माते आहेत.

या चित्रपटात राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, संभाजी भगत, अभिजित थिटे, सोहम बाबर आणि अभिषेक झेंडे यांच्या प्रमुख भूमिका असून, अनेक गुणी बालकलाकारही या चित्रपटाचा भाग आहेत. दरम्यान, 'तुझ्या आयला' सिनेमा 25 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

पाहा VIDEO : 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
Anirudh Ravichander and Kavya Maran: काव्या मारन अन् अनिरुद्ध रविचंदर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार? दोघांमध्ये किती वर्षांचं अंतर?
काव्या मारन अन् अनिरुद्ध रविचंदर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार? दोघांमध्ये किती वर्षांचं अंतर?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
Advertisement

व्हिडीओ

Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
Satara DCC Bank : गावाला नडणाऱ्या जयकुमार गोरेंना सख्खा भाऊ भिडला, जिल्हा बँकेत एकमेकांविरोधात अर्ज, साताऱ्यात काट्याची लढाई
गावाला नडणाऱ्या जयकुमार गोरेंना सख्खा भाऊ भिडला, जिल्हा बँकेत एकमेकांविरोधात अर्ज, साताऱ्यात काट्याची लढाई

Embed widget