Mahesh Manjrekar Movie : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या  (Mahesh Manjrekar) वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच त्यांचा  'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' (Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. परंतू या चित्रपटातीत दाखण्यात आलेल्या दृष्यांमुळे महिला आयोगाने  या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवली. त्यामुळे आता या चित्रपटाचा ट्रेलर सर्व प्लॅटफोर्मवरून हटवण्यात आला आहे. 






काय आहे प्रकरण 
14 जानेवारीला  'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. परंतू ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या  आक्षेपार्ह दृष्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगानं या चित्रपटाचा विरोध करत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे. ट्रेलरमध्ये आक्षेपार्ह दृश्यं दाखविण्यात आली होती. त्यामुळे महिला आयोगाने या ट्रेलरला विरोध केला आहे. हा ट्रेलर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. परंतू तो आता सर्व प्लॅटफोर्मवरून हटवण्यात आला आहे. 


वरन भात लोन्चा,  कोण नाय कोन्चा या महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमात महिला आणि लहान मुलांबद्दल आक्षेपार्ह दृष्ये आणि भाषा वापरण्यात आल्याच्या तक्रारी पालकांकडून महिला आयोगाला प्राप्त झाल्यात. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना पत्र लिहून याबाबत लेखी खुलासा करण्यास सांगितलय.  वरन भात लोन्चा कोण नाय कोन्चा या सिनेमाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महिला आणि लहान मुलांची अवहेलना करण्यात आल्याच रुपाली चाकणकर यांनी म्हटलय.  या चित्रपटाच प्रदर्शन रोखण्याची मागणी होत असल्याच रुपाली चाकणकर यांनी या पत्रात नमूद केलय. याबाबत रूपाली चाकणकर यांनी ट्वीट देखील केले आहे. 






संबंधित बातम्या


Underwater Painting of Pushpa :  अल्लू अर्जुनचा 'जबरा फॅन'; साकारले पुष्पा चित्रपटातील लूकचे अंडर वॉटर पेंटिंग


Allu Arjun : प्रायव्हेट जेट,लग्झरी गाड्या अन् आलिशान घर ; अल्लू अर्जुनची डोळे विस्फारणारी संपत्ती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha