दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो...
1. महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊनची गरज नाही, आज पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भूमिका मांडणार, मात्र राज्यात 15 तारखेपर्यंत निर्बंध कायम
देशातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा आज चर्चा करणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील सहभागी होणार आहेत. आजारपणानंतर पहिल्या मोठ्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहभागी होत असल्याने त्यांच्या सहभागाबद्दल उत्सुकता लागली आहे.
सध्या देशातमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक बोलावली आहे. दरम्यान,रविवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली देशातील कोरोनाची परिस्थिती, आरोग्याच्या पायाभूत सुविधांची सुरू असलेली तयारी, देशातील लसीकरण मोहिमेची स्थिती, ओमायक्रॉनचा वाढता प्रसार या सर्वांचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा झाली होती. यावेळी त्यांनी जिल्हा स्तरावर आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि मिशन मोडवर प्रौढांसाठी लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले होते. त्याचवेळी, राज्यांची परिस्थिती, तयारी आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली जाईल, असे त्यांनी सांगितले होते.
2. राज्यात किमान 15 फेब्रुवारीपर्यंत निर्बंध कायम राहणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, तर शाळाही तूर्तास बंदच
3. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली, काल दिवसभरात 16 हजार 420 जण पॉझिटिव्ह, तर राज्यांत 24 तासांत 46,723 रुग्णांची नोंद
4. ओमायक्रॉनच्या संसर्गानंतर ब्रेन फॉगच्या धोक्याची शक्यता, तज्ज्ञांची माहिती, कोरोनावरच्या उपचारासाठी मोलनुपिरावीर औषधांचा सरसकट वापरही धोकादायक
5. राज्यातल्या सर्व दुकानांवर इतर भाषांच्या तुलनेत मराठी नाव मोठं ठेवणं बंधनकारक, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्सचा विरोध
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 13 जानेवारी 2022 : गुरुवार
6. महाबळेश्वरमध्ये पारा शून्यावर, अनेक जिल्ह्यात 10 अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद, चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र गारठला
7. मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी ड्रोन हल्ल्याचं सावट, डार्क नेटवर झालेलं संभाषण यंत्रणांच्या हाती, अँटी ड्रोन यंत्रणा कार्यन्वित करण्याची गरज अधोरेखित
8. देशात महागाईनं मोडला सहा महिन्यांचा रेकॉर्ड, जीवनावश्यक वस्तूचे दर वाढल्यानं सामान्यांच्या खिशाला भार, महागाईचा दर 5.59 टक्क्यांवर
9. महेश मांजरेकरांचा आगामी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, ट्रेलरमधल्या आक्षेपार्ह दृश्यांवरुन राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार
10. केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 210 धावांत गुंडाळण्यात भारताला यश, बुमराच्या खात्यात 5 विकेट्स