Toxic on OTT: खूंखार अवतार, इंटिमेट सीन्सची निगेटिव्ह चर्चा भोवली; Box Office नंतर आता Toxicची OTT वर एन्ट्री, कुठे व कधी पाहता येणार?
जर तुम्ही अद्याप ‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ पाहिलेला नसेल, तर तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे.

Yash Toxic OTT Deal: यशच्या चाहत्यांना ज्याची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती, तो सिनेमा म्हणजे ‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’. (Toxic) साऊथ सुपरस्टार यशच्या या सिनेमाची यंदाच्या बहुचर्चित चित्रपटांमध्ये गणना केली जात होती. मात्र, थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर खराब कथानकामुळे ‘टॉक्सिक’ला अपेक्षित यश मिळालं नाही. गेल्या काही दिवसांपासून यश स्टारर ‘टॉक्सिक’च्या ओटीटी रिलीजबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. आता मात्र हा सिनेमा ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येणार, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चला जाणून घेऊया ‘टॉक्सिक’च्या ओटीटी रिलीजची संपूर्ण माहिती...
ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येणार ‘टॉक्सिक’?
ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 ने ‘टॉक्सिक’चे डिजिटल राइट्स खरेदी केले आहेत. त्यामुळे हा सिनेमा लवकरच ZEE5 वर ऑनलाइन स्ट्रीम केला जाणार आहे. रिपोर्टनुसार, ‘टॉक्सिक’ची ओटीटी रिलीज डेटही निश्चित झाली असून 25 सप्टेंबरला यशचा हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांना निराश करणाऱ्या ‘टॉक्सिक’ला ओटीटीवर कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर तुम्ही अद्याप ‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ पाहिलेला नसेल, तर काही दिवसांनंतर हा सिनेमा ZEE5 वर घरबसल्या पाहता येणार आहे.
150 कोटींची ओटीटी डील नाकारली होती?
‘टॉक्सिक’च्या ओटीटी रिलीजपूर्वी या सिनेमाच्या डिजिटल राइट्सबाबत मोठी चर्चा रंगली होती. रिलीजआधी दिग्दर्शक गीतू मोहनदास यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘टॉक्सिक’ने एका मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मकडून मिळालेली तब्बल 150 कोटी रुपयांची ओटीटी डील नाकारल्याचं वृत्त समोर आलं होतं.मात्र, सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर त्याच्या ओटीटी डीलची परिस्थितीही बदलल्याचा दावा करण्यात आला. रिपोर्टनुसार, त्यानंतर ‘टॉक्सिक’साठी 30 कोटी रुपयांची डीलही होत नव्हती.
नेगेटिव्ह रिव्ह्यूमुळे बिघडला खेळ
‘केजीएफ चॅप्टर 2’च्या जबरदस्त यशानंतर तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यशने ‘टॉक्सिक’मधून सिनेमागृहात पुनरागमन केलं होतं. त्यामुळे या सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. रिलीजपूर्वी ‘टॉक्सिक’ची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं. सिनेमाच्या कथानकावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. समीक्षकांकडूनही ‘टॉक्सिक’ला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. खराब कथा आणि निगेटिव्ह रिव्ह्यू याचा थेट परिणाम सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर झाला आणि ‘टॉक्सिक’ अपयशी ठरला.





















