मुंबई : जवळपास वर्षभरानंतर पुन्हा एकदा नाट्यगृहाची दारं खुली होत आहेत. पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांची मनमुराद दाद मिळवत कलाकार रंगमंचावर वावरणार आहेत आणि त्याच आनंदक्षणाचं औचित्य साधून एकदंत थिएटर्स "नमितो तुजला कलेश्वरा" ही नांदी रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, प्रियांका बर्वे, शरयू दाते अशा दिग्गज गायकांनी ही नांदी आहे.  


या नांदीचे लेखन निनाद कदम यांनी केले आहे. तर मैत्रेय याने उत्तमरित्या संगीतबद्ध केली आहे. या नांदीचे दिग्दर्शन दिव्येश बापटने केले आहे. तर रोहित जयवंतने छायाचित्रण केले आहे. तर प्रणव हरिदासने संगीत संयोजनाची धुरा सांभाळली आहे. या नांदीत तन्वी पालव आणि तिच्या सहकाऱ्यांनी कथक नृत्याविष्काराची झलक दाखवली आहे. 


या नांदीचे दिग्दर्शन केलेला दिव्येश बापट म्हणतो,"नव्या दमाची, नव्या युगाची नांदी आहे. २३ तारखेपासून पुन्हा एकदा नाट्यगृह सुरू झाली असल्याने नटराजाला आणि रंगभूमी ला वंदन करण्यासाठी ही नवीन नांदी आम्ही प्रेक्षाकांसमोर आणली आहे".    


राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, प्रियांका बर्वे, शरयू दाते या चौघांनी ही नांदी सादर केली आहे. तर ती यांच्यावरच चित्रित सुद्धा झालेली आहे. या नांदीच्या अनुभवाबद्दल राहुल देशपांडे म्हणतात,"अत्यंत प्रासादिक आणि सुंदर चाल ह्या नांदी ला दिली गेलेली आहे त्यामुळे गाताना खूप प्रसन्न वाटलं". 


ही नांदी जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची आणि नाट्यगृहं पुन्हा एकदा उघडण्याचा आनंदसोहळा प्रत्येकाने साजरा करावा, अशी इच्छा नांदीच्या टीमने व्यक्त केली. एकंदरीत नव्या युगाची, नव्या दमाची नांदी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या नांदीचा ट्रेलर आज नाट्यगृहे सुरू होत असल्याने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर 1 नोव्हेंबर 2021 ला स्मृतिगंधच्या पेजवर पूर्ण नांदीचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.


सध्या रंगभूमीवर सुरू असलेली मराठी नाटकं


'एका लग्नाची पुढची गोष्ट'
23 ऑक्टो. दु. 4.30 डोंबिवली
24 ऑक्टो. दु. 1 कोथरुड
24 ऑक्टो. सं. 5.30 बालगंधर्व
30 ऑक्टो. दु. 4 बोरिवली
31 ऑक्टो. दु. 4 दिनानाथ


'तू म्हणशील तसं'
23 ऑक्टो. दु. 4.30 बोरिवली 
24 ऑक्टो. दु. 4.30 ठाणे (काशीनाथ घाणेकर नाट्यगृह)


अलबत्या गलबत्या, व्हॅक्यूम क्लीनर, सही रे सही, चंद्रकांत कुलकर्णींचे नवं कोरं नाटक दिवाळीच्या शुभमुहुर्तावर नाट्य रसिकांच्या भेटीला येणार आहे. 


सिनेमागृहात प्रदर्शित होणारे आगामी मराठी सिनेमे
जयंती - 12 नोव्हेंबर
झिम्मा - 19  नोव्हेंबर
गोदावरी - 3 डिसेंबर
डार्लिंग - 10 डिसेंबर
फ्री हिट दणका - 17 डिसेंबर
दे धक्का 2 - 1 जानेवारी