मुंबई: एकांकिकांच्या विषयांमधील विविध छटा असणारी स्पर्धा म्हणजे चतुरंग आयोजित सवाई एकांकिका स्पर्धा (Sawai Ekankika Spardha 2023 Mumbai). तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणाऱ्या या स्पर्धेचं यंदाचं हे 34वं वर्ष होतं. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत अखेर महर्षी दयानंद महाविद्यालयच्या 'बारम' (Baram) या एकांकिकेने  बाजी मारली. सर्वोत्तम एकांकिकेसह 'बारम' या एकांकिकेने अन्य चार पुरस्कारांवरही मोहोर उमटवली. याच एकांकिकेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक,  ध्वनीसंयोजक, नेपथ्यकार आणि प्रेक्षक पारितोषिक मिळालं. तर कीर्ती महाविद्यालयाच्या 'उकळी' या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात पार पडली. 




सवाई एकांकिका स्पर्धेची (Sawai Ekankika Spardha 2023 Mumbai) सुमारे साडेतीन दशकांची वाटचाल ही सवाईचे स्पर्धक, प्रेक्षक, जाणकार परीक्षक, परीक्षक पद्धतीतील प्रयोगशीलता, नामवंतांची आग्रही उपस्थिती अशा अनेक घटकांमुळे लक्षणीय आणि लक्षवेधी ठरते. सवाई एकांकिका स्पर्धा ही राज्यभरातल्या केवळ प्रथम पारितोषिक विजेत्यांची स्पर्धा असते. या स्पर्धेमुळे मुंबईबाहेरच्या कलाकारांना मुंबईत आपली कला सादर करण्याची संधी मिळते.


दुसऱ्या स्थानावर कीर्ती महाविद्यालयाच्या 'उकळी'ने कोरलं नाव


यंदाच्या सवाईमध्ये आतापर्यंत गाजलेल्या 'उकळी' या कीर्ती महाविद्यालयाच्या एकांकिकेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर यासह उकळीला अन्य दोन पारितोषिक मिळाले.  या एकांकिकेच्या लेखकाला सर्वोत्कृष्ट लेखक आणि नाटकातील मम्मी या पात्राला सवाई अभिनेत्री पारितोषिक मिळालं. 




सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रणव जोशी-


पुण्याच्या मिलाप थिएटर टुगेदरच्या 'लेखकाचा कुत्रा' या नाटकातील प्रणव जोशीला सवाई अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं. 


या स्पर्धेतील इतर विजेते-


• सवाई प्रथम - चतुरंग प्रतिष्ठान पुरस्कृत- 'बारम' एकांकिका, महर्षी दयानंद महाविद्यालय मुंबई.


• सवाई द्वितीय - 'उकळी' एकांकिका, किर्ती एम डुंगरसी महाविद्यालय, मुंबई.


• सवाई लेखक- चैतन्य देशपांडे- 'उकळी' एकांकिका.


• सवाई दिग्दर्शक- यश पवार, ऋषिकेश मोहिते-  'बारम' एकांकिका.


• सवाई अभिनेता- प्रणव जोशी,- 'लेखकाचा कुत्रा' एकांकिका, पुणे.


• सवाई अभिनेत्री- ईशिका शिशुपाल,- 'उकळी' एकांकिका, मुंबई.


• सवाई प्रकाश योजनाकार- सिद्धेश नांदलस्कर, - तहान.


•सवाई ध्वनीसंयोजक- शुभम ढेकळे, - 'बारम' एकांकिका.


•सवाई नेपथ्यकार - दर्शन आबनावे, यश पवार,- 'बारम' एकांकिका.


•सवाई प्रेक्षक पारितोषिक - बारम एकांकिका. 


ही बातमी वाचा: 



  • Shubman Gill : 'सारा भाभी जैसी हो...', शुभमन गिलला पाहून चाहत्यांनी दिल्या घोषणा; विराट कोहलीने दिली मजेशीर प्रतिक्रिया