Jayprabha Studio, Bal Gandharva Ranga Mandir : सध्याच्या मल्टिप्लेक्स आणि ओटीटीच्या जगात आजही काही नाटकांच्या तिकीट काऊंटरवर 'हाऊसफुल'चा बोर्ड लागतो. कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर अनेक नवी आणि जुनी नाटके ही प्रेक्षकांच्या भेटीस आली. त्या नाटकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. काही दिवसांपूर्वी पुण्यामधील (Pune) बालगंधर्व रंगमंदिराच्या (Bal Gandharva Ranga Mandir) पुनर्विकासाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पुनर्विकासाचं काम सुरू झाल्यानंतर काही काळ या रंगमंदिरामध्ये तिसरी घंटा वाजणार नाही. त्यामुळे  बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कला सादर करणारे कलावंत हे आता रस्त्यावर उतरले आहेत. तसेच कोल्हापूरातील (Kolhapur) जयप्रभा स्टुडिओ (Jayprabha Studio)  वाचवण्यासाठी देखील तेथील काही कलाकार साखळी उपोषण करत आहेत. 


बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास कलाकारांचा विरोध 
बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्याचा पुनर्विकास करणार असल्याच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केलं. बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध करण्यासाठी लोककलावंतांचे बालगंधर्व रंगमंदिरात घंटानाद आंदोलन.  लोककला सादर करून या कलाकारांनी निषेध व्यक्त केला.  बालगंधर्व रंगमंदिर पडल्यास पुनर्विकास करण्यासाठी ते अनेक वर्षं बंद ठेवावं लागेल आणि त्याचा परिणाम आपल्या व्यसायावर होईल अस या लोककलावंतांचं मतं आहे.   


जयप्रभा स्टुडिओ 
कोल्हापुरातील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओमध्ये वाचला पाहिजे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज कोल्हापुरातील कलाकारांनी करवीर संस्थापिका ताराराणी यांच्या पुतळ्यासमोर मानवी साखळी करून पुन्हा एकदा जयप्रभा स्टुडिओ वाचविण्यासाठी आंदोलन सुरू केला आहे.


हेही वाचा :