Anek : भारतीय चित्रपट विश्वात अनेक अज्ञात विषयांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana ) रूपेरी पडद्यावर आपले भक्कम अस्तित्व सिद्ध केले आहे. तसेच, आपल्या अभिनयाने त्याने कोट्यवधी प्रेक्षकांची मनेही जिंकली आहेत. नुकताच सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) आयुष्मान खुराना आपल्या आगामी 'अनेक' (Anek) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सहकलाकार अँड्रिया केविचुसा आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत आला होता. या त्रिकुटाने प्रेक्षकांशी चित्रपटाबाबत संवाद साधला. तसेच, चित्रपटाच्या कथेमागील संदेशही उलगडून दाखवला.


या खास संवादाला अभिनेता आयुष्मानपासून सुरुवात झाली. होस्ट कपिल शर्माच्या हा चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे, या प्रश्नाला त्याने उत्तर दिले. आयुष्मान म्हणाला, 'अनेक'मध्ये एकच संदेश देण्यात आला आहे. तो म्हणजे, आपल्या देशात लोक अनेकविध धर्मांचे पालन करतात, वेगवेगळ्या भाषा बोलतात, वेगवेगळी वेशभूषा करतात, तरीही त्यांच्यात एकसमान जोश वा उत्साह असतो. 'अनेकता में एकता' हाच आमच्या चित्रपटाचा संदेश आहे.


ईशान्य भारतात म्हणजे 'पूर्वेकडील स्कॉटलँड'


ईशान्य भारतात चित्रीकरणाबाबतही आयुष्मानने काही खास गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, ‘या भागात चित्रीकरणादरम्यान आम्ही खूप धमाल केली. ही भारतातील अत्यंत सुंदर जागा आहे. हा प्रदेश अद्याप लोकांच्या गर्दीपासून लांब राहिलेला आहे. आम्ही आसाम, मेघालय आणि शिलाँगमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण केले. भारताचा हा भाग 'पूर्वेकडील स्कॉटलँड' म्हणून ओळखला जातो. इतकेच नव्हे, तर एक पर्यटक म्हणून तुम्ही तिकडे गेलात, तरी तुमच्यासाठी हा अत्यंत आनंददायी अनुभव ठरेल. भारतीय चित्रपट उद्योगासाठी तर हा अतिशय अस्पर्शित भूभाग आहे. येथे काम करताना आम्हाला खूप मजा आली!’


‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट


आयुष्मान खुरानाच्या 'अनेक' या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हाने केले आहे. हा चित्रपट आधी 31 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. पण, आता निर्मात्यांनी पुन्हा या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट आता 27 मे ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना जोशुआची भूमिका साकारत आहे. 'अनेक' चित्रपटानंतर आयुष्मान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या 'डॉक्टर जी' सिनेमात झळकणार आहे. हा चित्रपट 17 जून 2022 रोजी रिलीज होणार आहे.


हेही वाचा :


Panchayat Season 2 : प्रेक्षकांसाठी सरप्राईज! ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’


Cannes Film Festival 2022: लोकल ते ग्लोबल! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे पहिले लोककलाकार ठरले राजस्थानचे मामे खान


Happy Birthday Nawazuddin Siddiqui : कधीकाळी वॉचमनचे काम केले, दारोदारी मसाले विकले! आता बॉलिवूडवर राज्य करतोय नवाजुद्दीन सिद्दीकी!