Bhagyashree Mote : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटेला (Bhagyashree Mote) इंस्टाग्रामवर ईशानी अग्रवाल नावाच्या एका महिलेनं सांगितलं की, 'तुमच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स चांगले आहेत, इन्स्टाग्रामवर प्रमोट करण्यासाठी व्हिडिओ अपलोड करा.' त्यासाठी अभिनेत्रीला बारा हजार रुपये दिले होते. त्या नंतर टीव्ही अभिनेत्री भाग्यश्री मोटेला त्या महिलेनं शेअर बाजारमध्ये चांगला पैसा मिळेल म्हणून 75 हजार रुपयाची गुंतवणूक करायला सांगितलं.
टीव्ही अभिनेत्री भाग्यश्री मोटेनं 75 हजार रुपये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर अभिनेत्रीला जेव्हा कळाला आपल्या सायबर फसवणूक झाली आहे,तेव्हा तिनं काल रात्री आंबोली पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन गुन्हा नोंदवला आहे. आंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसी कलम 419, 420 आयटी ॲक्ट, गुन्हा दाखल केले आहेत. या संदर्भात अधिक तपास आंबोली पोलीस करत आहेत.
चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून तिने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. ती सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. तिचे लाखो फॉओअर्स आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक आणि कमेंट्सचा पाऊस असतो.
हेही वाचा :