एक्स्प्लोर

थिएटर्स खुली झाली असली तरीही नाट्यनिर्मात्यांचं सध्या वेट अँड वॉच

जागतिक रंगभूमीदिनीच राज्यात नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. थिएटर्स खुली झाली असली तरीही नाट्यनिर्मात्यांचं सध्या वेट एंड वॉच असणार आहे. शनिवार, रविवारी पुन्हा मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे.

जागतिक रंगभूमीदिनी समस्त नाट्यकर्मींना एक चांगली बातमी मिळाली ती नाट्यगृहं सुरु होण्याबाबतची. गेल्या मार्चपासून बंद झालेली थिएटर्स अखेर आता सुरु होणार आहेत. असं असलं तरी नाट्यनिर्मात्यांनी मात्र सध्या वेट एंड वॉचची भूमिका घेतली आहे. कारण सर्वसाधारणपणे अनलॉक होताना काही अटी शर्ती राज्य सरकारतर्फे घातल्या जातात. सर्वांनी या अटींचं पालन करणं अपेक्षित असतं. नाट्यगृहं सुरु करत असतानाच अशा कोणत्याही अटी अद्याप सरकारने जाहीर केलेल्या नाहीत. अपवाद 50 टक्के प्रेक्षकसंख्येचा. या अटीशर्ती ज्याला एसओपी म्हणतात. त्या जोवर येत नाहीत तोवर थांबण्याचा निर्णय नाट्यवर्तुळाने घेतला आहे. अर्थात माननीय मुख्यमंत्र्यांनी आज गुरुवारी नाट्यनिर्मात्यांशी संवाद साधून त्यांची बाजू ऐकून घेतली आहे. यावेळी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखही उपस्थित होते.

रंगभूमी दिनाचं औचित्य साधून गुरुवारी दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत निर्मात्यांशी संवाद साधला. या ऑनलाईन बैठकीला नाट्यपरिषदेचे अध्यक्ष आणि निर्माते प्रसाद कांबळी, ना्ट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर, रंगधर्मी नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर, अजित भुरे, शुभांगी दामले, प्रदीप वैद्य, सुबोध भावे, आदेश बांदेकर, प्रदीप कबरे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी निर्मात्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. अर्थात बैठकीच्या सुरुवातीलाच रंगभूमी दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर आता नाट्यगृहं अनलॉक करत असतानाच सर्व खबरदारी घेऊन नाटक व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबद्दलही एकमत झालं. तो सुरू करताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी याबद्दल उपस्थित सर्वांनी आपली मतं मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांसमोर मांडली. या बैठकीची माहिती निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर यांनी दिली.

ते म्हणाले, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनीही सरकारचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं सांगितलं. त्याचवेळी प्रेक्षकांची जबाबदारी महत्वाची असल्याचं कांबळी म्हणाले. शिवाय, केवळ प्रेक्षक नव्हे, तर सादरकर्ते कलाकार रंगमंच कामगार, थिएटर आदी सर्वच बाबींची काळजी घेणं आवश्यक असल्याचं सर्वांनीच सांगितलं. या बैठकीला सविस्तर चर्चा झालेली नाही. पण येत्या शनिवार-रविवारी मुख्यमंत्री पुन्हा एकदा वेळ देणार आहेत. त्यावेळी या न्यू नॉर्मलमध्ये नाट्यव्यवसायात पाळल्या जाणाऱ्या अटीशर्तींवर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येते आहे. अर्थात या नव्या नियमांचा काय परिणाम होतोय ते पाहून पुढच्या महिन्यात काही आवश्यक नियम लावले जातली तर काही अनावश्यक नियम काढले जातील. तशी मुभा या निय्मांमध्ये असावी अशी विनंती सुबोध भावे, आदेश बांदेकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

माझं नाटक माझी जबाबदारी माझं कुटुंबं माझी जबाबदारी हा सरकारने नारा दिलेला आहे. त्याच धर्तीवर आता माझं नाटक माझी जबाबदारी ही निर्मात्यांनी घ्यावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानुसार ज्याचं नाटक त्याने आपला प्रेक्षक आणि थिएटर यांची जबाबदारी घ्यावी असा संकेत यात देण्यात आल्याचं कळतं. अर्थात, त्याचसाठी काय नियम सर्वत्र पाळले जावेत त्याबद्दल येत्या शनिवार रविवारी निर्णय अपेक्षित आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget