Shiv Rawali on his Director Journey :  'द रेल्वे मेन - द अनटोल्ड स्टोरी ऑफ भोपाल 1984' (The Railway Men - The Untold Story of Bhopal 1984) या सिरिजचा दिग्दर्शक शिव रैवल (Shiv Rawali) याने नुकताच त्याचा शाहरुखसोबतचा (Shah Rukh Khan) एक किस्सा शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर (Netflix) 'द रेल्वे मेन' ही सिरिज प्रदर्शित करण्यात आली होती. या सिरिजचे शाहरुखने कौतुक केले असून ती खूप आवडल्याचं देखील यावेळी शाहरुखने दिग्दर्शक शिव रवैल याला सांगितलं. शाहरुखच्या या प्रतिक्रियेमुळे शिवला देखील आनंद झाल्याचं त्याने म्हटलं.


Netflix आणि YRF एंटरटेनमेंटची सीरीज द रेलवे मेन या सिरिजची गोष्ट ही वीरता आणि मानवतेची आहे. तसेच प्रेक्षकांनी देखील या सिरिजला भरभरुन प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. 18 नोव्हेंबर 2023 रोजी ही सिरिज प्रदर्शित करण्यात आली. तसेच या सिरिजचे 4 एपिसोड्स आहेत.  जगभरातील मीडिया आणि प्रेक्षकांकडून या सिरिजला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. तसेच नेटफ्लिक्सच्या चार्टमध्ये तीन महिन्यांपासून ही सिरिज टॉपमध्ये आहे. नुकतच शिव रैवल याने त्याच्या या दिग्दर्शनाच्या प्रवासाच्या एका मुलखती दरम्यान भाष्य केलं आहे. 


जेव्हा शाहरुखला सिरिज आवडते


शिव रवैल याने म्हटलं की, मला आतापर्यंत मिळालेला सगळ्यात चांगली दाद ही माझा सिनेमॅटिक आयकॉन शाहरुख खान यांच्याकडून मिळाली. मी त्यांना नुकताच भेटलो आणि त्याने मला ही सीरिज खूप आवडल्याचं सांगितलं.  इंडस्ट्रीने खूप प्रेम दाखवले आहे , मला वाटते की ही ओळख मिळलं फार कठिण गोष्ट असते. मी शाहरुख सरांसोबत एका फॅनच्या जाहिरीतीवर काम केलं आहे. त्यांनी माझ्या त्या कामाचे देखील कौतुक केले. 


'द रेल्वे मेन' सीरिजची गोष्ट


भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित ही गोष्ट आहे. भोपाळमध्ये रात्री उशीरा झालेल्या या दुर्घटनेमध्ये  भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या शौर्याची ही गोष्ट आहे. या झुंज देताना सर्व अडचणींवर मात करताना त्यांनी आपला जीव धोक्यात टाकला. त्यावर आधारित ही गोष्ट आहे. या सीरिजमध्ये आर माधवन, के के मेनन, दिव्येंदू, बाबिल खान, जुही चावला आणि मंदिरा बेदी यांच्यासह इतर कलाकरांचा समावेश आहे. 


ही बातमी वाचा : 


Sameer Vidwans Engagement : दिग्दर्शक, अभिनेता आणि लेखकानंतर समीर विध्वंसने खऱ्या आयुष्यात केली नवी इनिंग सुरु, साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिली गुड न्यूज!