Sameer Vidwans Engagement : सत्यप्रेम की कथा (Satyaprem Ki Katha), आनंदी गोपाळ (Anandi Gopal), लोकमान्य (Lokmanya), डबल सीट (Double Seat), धुरळा (Dhurala) यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक समीर विध्वंस (Sameer Vidwans) याने नुकताच साखरपुडा उरकला आहे. समीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत ही बातमी दिली. तसेच त्याच्या या फोटो अनेक कलाकार मंडळींनी देखील कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. समीरने अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्याने अभिनय देखील केलाय. त्यामुळे दिग्दर्शक, अभिनेता, लेखकानंतर समीर आता त्याच्या खऱ्या आयुष्यातली एक नवी इनिंग सुरु करणार आहे. 






व्हॅलेंटाईन्स डेच्या मुहूर्तावर जुईली सोनाळकर सोबत समीरचा साखरपुडा पार पडला. त्याने शेअर केलेल्या फोटोवर हेमंत ढोमे, शिवानी सुर्वे, स्वप्नील जोशी अशा त्याच्या अनेक मित्र मैत्रीणींनी कमेंट्स करत त्याच्या नव्या आयुष्याला शुभेच्छा दिल्या आहेत. इतकच नव्हे तर बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी हीने देखील समीरच्या फोटोवर कमेंट करत त्याच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. 


असा आहे समीरच्या करिअरचा प्रवास 


समीर विध्वंस याने अनेक मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  तसेच त्याने अनेक मराठी चित्रपटांचे लेखन देखील केले आहे. टाईम प्लीज, लग्न पाहावे करुन, क्लासमेट्स, डबल सीट, वायझेड, मला काहीच प्रॉब्लेम नाही, सायकल, आनंदी गोपाळ, धुरळा या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन समीरने केले. तसेच त्याने सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. तसेच लोकमान्य या चित्रपटामध्ये त्याने गोपाळ गणेश आगरकर यांची भूमिका साकारली होती.  त्याने बॉलीवूडमध्ये दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही चांगली कमाई केली. 


प्रथमेश परबचाही साखरपुडा संपन्न 


व्हॅलेंटाईन्स डेच्याच मुहूर्तावर अभिनेता प्रथमेश परब याने देखील गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर हिच्यासोबत साखरपुडा केला. तसेच प्रथमेश लवकरच विवाहबंधनात देखील अडकणार आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली. तसेच त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. 


ही बातमी वाचा : 


Prathamesh Parab Engagement : 'व्हॅलेंटाईन्स डे'चा मुहूर्त साधत दगडूच्या नव्या आयुष्याची सुरुवात, अभिनेता प्रमेथश परबचा साखरपुडा संपन्न