The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे सध्या त्यांच्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. सध्या विवेक अग्निहोत्री यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की विवेक म्हणत आहेत की,  'भोपाळी म्हणजे समलैंगिक'. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेस नेता दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


विवेक अग्निहोत्री यांचे वक्तव्य 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की विवेक अग्निहोत्री म्हणतात, 'मी भोपाळमध्ये राहिलो आहे पण मी भोपाळी नाहिये. कारण भोपाळी असण्याचा वेगळा अर्थ होतो. मी तुम्हाला याचा अर्थ नंतर सांगतो किंवा तुम्ही कोणत्या तरी भोपाळी असणाऱ्या व्यक्तीला विचारा. भोपाळी असणं म्हणजे  समलैंगिक (होमोसेक्सुअल) असणं, नवाबी आवडी असणारा.' 
  
दिग्विजय सिंह यांचं ट्वीट 
दिग्विजय सिंह यांनी विवेक यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला ट्विटरवर शेअर करून लिहिले, ' विवेक अग्निहोत्रीजी तुमचा हा वैयक्तिक अनुभव असेल पण हा अनुभव  भोपाळमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा नाहिये. मी 77 पासून भोपाळी लोकांच्या संपर्कात आहे. मला असा अनुभव आलेला नाही. तुम्ही कुठेही राहा, संगतीचा परिणाम तर होणारच '





'द कश्मीर फाइल्स' 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha