Ajit Pawar : जुन्नरचा बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला हलवला, हे धादांत खोटं आहे. बारामतीचा प्रकल्प 2016 ला मंजुर झालेला आहे, तर जुन्नरचा प्रकल्प वेगळा आहे. पण काहीजण यावर राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. पण काल मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी देखील बोललो आहे. आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण विभाग आहे. वन विभागाकडून जुन्नरमधे सर्वे करुन बिबट्या सफारीसाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले. 


पुणे ग्रामीण पोलीस कल्याण अंतर्गत विविध उपक्रमांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी अजित पवार पुण्यात बोलत होते. दरम्यान, अतुल बेनके आणि अमोल कोल्हे हे तिथले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना विश्वासात घेऊन बिबट्या सफारीचे काम सुरु करण्यात येईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले. काल विधिमंडळात गृहमंत्र्यांनी पोलीस दलाची ठामपणे पाठराखण केली असल्याचे अजित पवार म्हणाले. आता त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याची जबाबदारी तुमची आहे. भ्रष्टाचार, खंडणी, असे गैरप्रकार करु नका आणि असे गैरप्रकार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका अशा पोलिसांना सुचना अजित पवार यांनी दिल्या.


एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी


एसटीचा प्रश्न सुटला आहे. शेवटची संधी एसटी कर्मचाऱ्यांना दिली आहे. सातव्या वेत आयोगाच्या जवळपास त्यांना वेतन देण्याचं ठरवलं आहे. त्यांच्या पगारात पूर्वीपेक्षा वाढ करण्यात आली आहे. पगाराची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. सर्व करम्चाऱ्यांना आवाहन आहे की, सध्.या मुलांच्या परीक्षा सुरु आहेत. अडचणीच्या भागातून येतात. त्यांना कोणतेही दुसरे वाहन नाही. ज्यांच्यावर कारवाई केली त्यांना देखील संधी आहे. कोणाचंही न एकता 31 मार्चपर्यंत पुढे यावं एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजरं व्हावं. 31 मार्चपर्यंत जर ते कामावर हजर झाले नाहीत, तर त्या सगळ्यांना सांगतो की, जे येणार नाहीत, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचे अजित पवार म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: