Aishwarya Rai Bachchan’s Daughter : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची लाडकी लेक आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) हिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना नेहमीच असते. आराध्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील याआधी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, तिच्या शाळेतील युनिफॉर्ममधला फोटो पहिल्यांदाच समोर आला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध बच्चन कुटुंबातील लेकीचे चाहते खूप कौतुक करत आहेत.


मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अजूनही मनोरंजन विश्व गाजवत आहेत. त्यांची सून आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील चित्रपटात सक्रिय आहे. तर, अभिषेक बच्चन ही त्याच्या आगामी 'दसवी' या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. आई-वडील, आजी-आजोबा मोठे सिनेस्टार असले, तरी आराध्याही कुणापेक्षा कमी नाही. बच्चन कुटुंबातील या चिमुरडीचे सोशल मीडियावर अनेक फॅन पेज आहेत. यातीलच एका फॅन पेजने आराध्याच्या शाळेतील फोटो शेअर केला आहे.


पाहा पोस्ट :



या फोटोत 26 जानेवारीच्या निमित्ताने आराध्या तिच्या वर्गमित्रांसह शाळेच्या कॅम्पसमध्ये उभी असताना दिसते. दोन वेण्या, शाळेचा गणवेश घालून कोरोनापासून बचाव करण्यासाठी तोंडाला मास्क लावलेल्या आराध्याचा फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'ती बच्चन आहे म्हणून नाही, तर तिचा साधेपणा खरंच विलक्षण आहे.’ अनेक चाहत्यांनी आराध्याच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिचे कौतुक केले आहे.


याआधीही आराध्या बच्चनच्या शाळेतील स्नेहसंमेलनाचे फोटो समोर आले होते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात आराध्या ही अतिशय क्युट स्टार कीड आहे. ऐश्वर्या अनेकदा तिच्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.


हेही वाचा:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha