The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) चित्रपट 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. 11 मार्चपासून थिएटरमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे शो अजूनही हाऊसफुल्ल होत आहेत. 3.55 कोटींच्या ओपनिंगनंतर, ‘द काश्मीर फाईल्स’ने दुसऱ्या दिवसापासून दोन आकडी कमाई करण्यास सुरुवात केली. आता पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनने तब्बल 50 कोटींचा आकडा पार केला आहे. 


चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाचे अपडेटेड कलेक्शन शेअर केले आहे. त्यांनी लिहिले की, '#TheKashmirFiles बॉक्स ऑफिसवर त्सुनामीसारखा सुरु आहे....विलक्षण ट्रेंडिंग, फूटफॉल्स, ऑक्युपन्सी, संख्या या सर्व गोष्टी वाढत आहेत... 5वा दिवस बाकीच्या दिवसांपेक्षा अधिक कमाई...ब्लॉकबस्टर... शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 8.50 कोटी, रविवारी 15.10 कोटी, सोमवार 15.05 कोटी, मंगळवारी 18 कोटी, एकूण-60.20 कोटी.’


 







‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईचा हा आकडा अतिशय वेगाने वाढत आहे. या छोट्या बजेटच्या चित्रपटाने पाच दिवसांत एवढे मोठे कलेक्शन करून एक नवा विक्रम रचला आहे. वीकेंड व्यतिरिक्त आठवड्याच्या मधल्या दिवशीही चित्रपटाचे इतके जबरदस्त कलेक्शन असणं की खरोखरंच आश्चर्याची गोष्ट आहे. 


अनेक राज्यांमध्ये चित्रपट करमुक्त!


दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटात काश्मिरी पंडितांवरील अत्याचार अतिशय ठळक पद्धतीने दाखवले आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. देशातील 7 राज्यांनी या चित्रपटाळा करमुक्त घोषित केले आहे. या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, गोवा, त्रिपुरा आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. काश्मिरी पंडितांवर झालेला अनन्या आणि हल्ल्यांचे विदारक सत्य सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले जात आहे.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha