Haunted House : सध्याच्या आधुनिक युगामध्ये भूतांवर किंवा हॉन्टेड स्टोरीजवर कोणी विश्वास ठेवत नाही. पण काही हॉरर कथांवर आधारित असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. 2013 मध्ये रिलीज झालेल्या द कॉन्ज्यूरिंग (The Conjuring) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रोड आयलँडमधील हॉन्टेड हाऊस (Haunted House ) विकले गेले आहे. या घरावर त्या चित्रपटाचे कथानक आधारित आहे, असं म्हटलं जातं. या घराच्या मालकानं हे घर 1.5 मिलियन डॉलरला म्हणजेच जवळपास 11,63,65,125 रुपयांना विकले आहे.
रोड आयलँडची ही प्रोपर्टी 1726 ची आहे. या हॉन्टेड हाऊसला अमेरिकेतील सर्वात जास्त भयानक घर मानले जाते. 1971 ते 1980 पर्यंत या घरात राहणाऱ्या आंद्रिया पेरॉन यांनी सांगितले की, तिच्या कुटुंबाला घरात अनेक हॉन्टेड घटनांचा सामना करावा लागला. तिने पुढे सांगितले की, तिच्या वृद्ध आईला तिनं हवेत उडताना पाहिलं. त्याशिवाय तिला घरातल्या एका अज्ञात व्यक्तीनं चापट मारली होती, असंही तिनं सांगितलं. पॅरानॉर्मल इनवेस्टिगेटर एड आणि लोरेन वारेन यांनी त्यावेळी आंद्रिया पेरॉनच्या परिवाराची मदत केली होती.
पॅरानॉर्मल इनवेस्टिगेट जेन आणि कोरी हेनजेन यांनी रोड आयलँडमधील या बंगल्याला 4,39,00 डॉलरला विकत घेतलं. त्यानंतर फेसबुकवर त्यांनी एक जाहिरात शेअर केली. या जाहिरातीमध्ये ते हे घर विकत आहेत, अशी माहिती त्यांनी नेटकऱ्यांना दिली. त्यांनी हे घर विकण्याचा निर्णय 2021 मध्ये घेतला.
रोड आइलँडमधील हे हॉन्टेड हाऊस 3,100 स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे, ज्यामध्ये 3 बेडरूम्स आहेत. हा बंगला जॅकलिन नुनेज यांनी विकत घेतला आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं , 'ही अशी मालमत्ता आहे जी लोकांना मृत व्यक्तींशी बोलण्यास सक्षम करते.'
हेही वाचा :