Sriya Lenka: ओडिशाची श्रिया लेंका (Sriya Lenka) ही भारतातील पहिली के-पॉप स्टार बनली आहे. यूट्यूबवर ऑडिशन दिलेल्या श्रियाची ‘ब्लॅकस्वॉन’ या के-पॉप बँडसाठी निवड झाली आहे. अनेक के-ड्रामा आणि ऑनलाईन सीरीज पाहून श्रिया कोरियन भाषा शिकली. के-पॉप म्हणजेच कोरियन पॉप बद्दल लोकांमध्ये वेगळ्या प्रकारची क्रेझ आहे. भारताच्या ओडिशा येथील अवघ्या 18 वर्षीय श्रिया लेंका ही देखील के-पॉप बँडचा एक भाग बनली आहे.


श्रियाने K-pop बँड Blackswon मध्ये तिचे स्थान पटकावले आहे आणि हे स्थान पटकावणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.


 






कशी झाली श्रियाची निवड?


गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, रौकेला शहरातील श्रियाची कोरियन पॉप बँड ब्लॅकस्वॉनची सदस्य होण्याच्या अंतिम टप्प्यासाठी निवड झाली होती. याअंतर्गत तिला सोलमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. या बँडमधील एका सदस्याने नोव्हेंबर 2020मध्ये हा बँड सोडला. यानंतर, डीआर म्युझिकने गेल्या वर्षी मे महिन्यात एक जागतिक घोषणा केली. यानंतर यूट्यूब ऑडिशन कार्यक्रमानंतर श्रियाची निवड झाली. श्रिया यंगहुन, फटौ, ज्युडी आणि लेया यांच्यासह बँडमध्ये सामील होणार आहे. त्याच वेळी, ब्राझीलची गॅब्रिएला डेलिसन सहावी सदस्य म्हणून या बँडमध्ये सामील झाली आहे.


DR म्युझिक कंपनीच्या वतीने इंस्टाग्रामवर श्रिया आणि ग्रॅबिलाचे फोटो शेअर करून त्यांचे बँडमध्ये स्वागत करण्यात आले आहे. आता दोघीही काही महिने सरावासाठी सोलमध्ये राहतील. यानंतर त्यांचा एक ग्रुप अल्बम बनवला जाईल. ‘ब्लॅकस्वॉन’ बँड 2011 मध्ये सुरू झाला होता. या टीममध्ये त्यावेळी चार सदस्य होते. आता श्रिया आणि गॅब्रिएला देखील या बँडमध्ये सामील झाल्या आहेत.


हेही वाचा :


Samantha Ruth Prabhu : ट्रोलर म्हणाला ‘ती तिच्या कुत्र्या-मांजरासोबत एकटीच मरेल’, सडतोड उत्तर देत समंथा म्हणते...


Swatantra Veer Savarkar : रणदीप हुडाचा ‘वीर सावरकर’ चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला!


Ye Re Ye Re Pausa : अभिनेत्री छाया कदम पुन्हा एकदा दमदार भूमिकेत! ‘येरे येरे पावसा’मध्ये साकारणार ‘जुबैदा’