एक्स्प्लोर

Thane Crime: ग्लॅमरच्या आड सुरू होता अभिनेत्रीचा घाणेरडा खेळ! मुलींना जाळ्यात ओढत देहविक्री करायला लावायची, ठाण्यात थरार

Thane crime: पोलिसांच्या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी एक हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Thane Crime: चित्रपट आणि वेब मनोरंजन क्षेत्रातील चकाकीच्या आड दडलेला धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. अभिनयाच्या संधीचे आमिष दाखवून महिलांना देहव्यापाराच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रकार सुरू असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी हिंदी वेब सिरीजमध्ये काम केलेल्या 26 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे हीच अभिनेत्री मुलींना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांच्या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी एक हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणाचा उलगडा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीमुळे झाला. संबंधित तरुणी मोठ्या पैशांचे आमिष दाखवून तरुणींना ग्राहकांकडे पाठवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधला. संवादादरम्यान आरोपीने वेब सिरीज आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या मुली उपलब्ध करून देऊ शकते, असे सांगत काही फोटोही पाठवले.

व्यवहार ठरल्यानंतर आरोपी दोन महिलांसह ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमध्ये आली. मात्र, पोलिसांनी आधीच सापळा रचून ठेवला होता. योग्य क्षणी छापा टाकत तिला ताब्यात घेण्यात आले.

वेबसिरीजमध्ये लहानसहान भूमिका पडद्याच्या मागे काळे बेरे 

चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी मुंबईत भाड्याच्या घरात राहत होती आणि वेब सिरीजमध्ये लहान भूमिका करत होती. नियमित उत्पन्न अपुरे पडत असल्याने तिने हा बेकायदेशीर मार्ग स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. घरखर्च, बहिणीचे शिक्षण, तसेच आई-वडिलांना आर्थिक मदत करण्याच्या कारणामुळे ती या रॅकेटमध्ये सक्रिय झाल्याची माहिती तपासातून पुढे आली. या कारवाईत 40 आणि 48 वर्षांच्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयाने 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
Akanksha Choudhary: 'मला जबरदस्तीने गाडीत बसवलं अन्...' पुण्यातील नवरात्री इव्हेंटमध्ये मॉडेलसोबत भयंकर घडलं, VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
'मला जबरदस्तीने गाडीत बसवलं अन्...' पुण्यातील नवरात्री इव्हेंटमध्ये मॉडेलसोबत भयंकर घडलं, VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
Obsession OTT Release: रिलीज होताच भारतात 99 कोटी कमावले; तरुणांना वेड लावणारा ‘ऑब्सेशन’ आता ओटीटीवर! या दिवशी हिंदीतही पाहता येणार
रिलीज होताच भारतात 99 कोटी कमावले; तरुणांना वेड लावणारा ‘ऑब्सेशन’ आता ओटीटीवर! या दिवशी हिंदीतही पाहता येणार
Ajinkya Deo Maherchi Saadi: 'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Embed widget