Teri Meri Dastaan : प्रेम या शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एक वेगळीच कहाणी असते. राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता सिद्धार्थ मेनन (Siddharth Menon) आणि अभिनेत्री पल्लवी पाटील (Pallavi Patil) यांच्या प्रेमाची रोमँटिक दास्तान लव्हेबल अंदाजात लवकरच आपल्याला पहायला मिळणारआहे. ‘तेरी मेरी दास्तान’ (Teri Meri Dastaan) या हिंदी गाण्याच्या अल्बम मधून हे दोघे आपल्या भेटीला येणार आहेत. या म्युझिक अल्बमच्यामाध्यमातून व्हिडीओ पॅलेस हिंदी अल्बम निर्मीती क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.


‘तेरी मेरी दास्तान’ अल्बम मधील गाणं काश्मीरमधील हटके लोकेशनवर चित्रीत केलं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे तरकाश्मीरचे नेत्रसुखद सौंदर्य दाखवण्याचे काम राष्ट्रीय पारितोषिक विजेते छायालेखकअमोल गोळे यांनी केले आहे. अब्दुल शेख याने गायलेल्या या गाण्याला विदुर आनंदयांचे संगीत लाभले आहे.


या गाण्यात सिद्धार्थचा शांत तर पल्लवीचा काहीशा चुलबुला अंदाज पहायला मिळणार आहे. प्रत्येक प्रेमकथेतअसणारा ‘प्रेम’ हा समान धागा सोडला तर प्रत्येकाच्याच प्रेमाची एक निराळीगोष्ट असते अशीच प्रेमात पाडणारी ‘लव्हेबल’ गोष्ट या अल्बम मधून उलगडणार आहे.


पाहा गाणं: 



तेरी मेरी दास्तानच्या शूटिंग अनुभवाबद्दलबोलताना सिद्धार्थ आणि पल्लवी सांगतात की, 3 डिग्री तापमानात आम्ही हे शूटपूर्ण केलं असून ते आम्ही खूप एन्जॉय केलं. गाण्याची ही रोमँटिक सफर प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.


सिद्धार्थनं पोपट,एकुलती एक,पोश्टर गर्ल, काही हरकत नाही, तिढा या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर पल्लवी पाटीलनं क्लासमेट्स, शेंटिमेंटल,  702 दीक्षित्स या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सिद्धार्थ आणि पल्लवीच्या या गाण्याला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


वाचा इतर बातम्या: