Maharashtra Cabinet Expansion : गेल्या 39 दिवसांपासून लवकरच होणार, लवकरच होणार म्हणून रखडलेल्या फुटीर एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आज मुख्यमंत्री शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आज दोन्ही गटाकडून 18 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे गटातील 9 तर भाजपकडून 9 जणांचा समावेश आहे.


अर्थातच भाजपकडून मागील सरकारमधील दिग्गजांना संधी देण्यात आला आहे, तर अतुल सावे हा नवीन चेहरा दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 


शिवाजी चौकात भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला. दादांमुळे जिल्ह्यातील प्रलंबित कामे मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी राहुल चिकोडे यांनी व्यक्त केला. दादांवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळाल्याचेही टोलाही त्यांनी लगावला. दादांना हिमालयात जावं लागेल म्हणणाऱ्यांना आता हिमालयात जावं लागेल, असा टोला महेश जाधव यांनी लगावला. 



दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सुद्धा चंद्रकांत पाटील यांचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातून शिंदे सरकारमध्ये भाजपकडून चंद्रकांत पाटील, तर सांगलीमधून सुरेश खाडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सुरेश खाडे यांच्याकडे जाऊ शकते. 


मंत्रिमंडळ विस्तार झाला असला, तरी मंत्रिपदाचे वाटप झालेले नाही. त्यामुळे गेल्या सरकारमध्ये आणि महसूल मंत्रिपद भूषवलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोणती जबाबदारी येते याकडे लक्ष लागून राहिले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या