Entertainment News Live Updates 9 August: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Aug 2022 05:59 PM
Kaun Banega Crorepati 14 : 'शतरंज के खिलाडी' आणि अमिताभ बच्चनचं खास नातं

अमिताभ बच्चन यांनी 'शतरंज के खिलाडी'बाबत एक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली. 'शतरंज के खिलाडी' या सिनेमाचं कथानक अमिताभ बच्चन यांनी लिहिलं असल्याचं ते म्हणाले."

रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर सोनू सूदची प्रतिक्रिया, म्हणाला “लोकांच्या प्रतिक्रियांसाठी जर…”

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदला रणवीरच्या न्यूड फोटोशूटबाबत त्याचे मत विचारण्यात आले. यावर तो म्हणाला, “फोटोशूट कसे करायचे ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. आपण अशा समजात राहतो जिथे तुम्ही काही केल तर तुमच्याकडे बोट दाखवणारे बरेचजण असतात. पण जेव्हा तुम्ही असं काही करण्याचा विचार करता, तेव्हा तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील याचा अंदाज असतो. त्यामुळे जर त्या प्रतिक्रियांसाठी तुम्ही तयार असाल तर असे काही करण्यास हरकत नाही.”

Thor Love and Thunder : 'थोर लव्ह अॅन्ड थंडर'ने पार केला 100 कोटींचा टप्पा

Thor Love and Thunder Collection in India : हॉलिवूडचा सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थचा (Chris Hemsworth) 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' (Thor Love And Thunder) हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. जगभरात या सिनेमाने अनेक रेकॉर्ड केले आहेत. भारतात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 

“मी तुम्हाला लहानपणी…” हेमांगी कवीने सांगितला ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या पहिल्या भेटीचा ‘तो’ किस्सा

 अभिनेत्री हेमांगी कवीनेदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने प्रदीप पटवर्धन यांना पहिल्यांदा भेटण्याचा किस्सा सांगितला आहे.





Adhantar : जयंत पवारांचं 'अधांतर' पुन्हा रंगभूमीवर येणार

Adhantar : मराठी नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवंगत लेखक जयंत पवार लिखित 'अधांतर' (Adhantar) हे नाटक तब्बल 25 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर सादर होणार आहे. 'प्रयोगशाळा' संस्थेने या नाटकाची निर्मिती केली असून 'नाटक मंडळी' ते सादर करत आहेत. आता पुन्हा एकदा हे नाटक नव्याने रंगभूमीवर येणार आहे. 

Roop Nagar Ke Cheetey : ‘होऊन जाऊ दे’ गाण्याचा सोशल मीडियावर बोलबाला! एका दिवसांत मिळवले 2 मिलियन व्हूज!

Houn Jau De Song : मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या 'रूप नगर के चीते' (Roop Nagar Ke Cheetey) या मराठी चित्रपटातील ‘होऊन जाऊ दे’ या गाण्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या 24 तासांत या गाण्याने 2 मिलियन्स अर्थात 20 लाख व्हूयुजचा टप्पा पार करत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.


 





Rang Majha Vegla :‘आई’ म्हणत लेक दीपाकडे परतणार!

रणवीर सिंहच्या फोटोशूटवर सोनू सूदची प्रतिक्रिया, म्हणाला...

रणवीर सिंहच्या फोटोशूटवर सोनू सूदची प्रतिक्रिया, म्हणाला ‘आपण अशा जगात राहतो, जिथे तुम्ही काही करता तेव्हा बरेच लोक तुमच्याकडे बोट दाखवतात. मात्र, जेव्हा तुम्ही असे फोटोशूट करता, तेव्हा तुम्हालाही अशा प्रकारच्या प्रतिक्रियेसाठी तयार राहावे लागते.’


 





क्राईम आणि थ्रिलरचं कॉकटेल, 'सिक्रेट ऑफ गावस्कर' वेब सीरिजचा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

क्राईम, रोमान्स, ऍक्शन, वजनदार कथानक, आणि उत्कृष्ट कलाकार यांची सांगड घालत ओटीटी विश्वावर राज्य करण्यासाठी क्राईम आणि थ्रिलरचं कॉकटेल घेऊन 'सिक्रेट ऑफ गावस्कर' (Secrets of Gavaskar) ही नवीकोरी वेब सीरिज तगड्या स्टारकास्टसह प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज होत आहे.


 



Koffee With Karan 7 : 'मॉम टू बी' सोनम आणि अर्जुन कपूर लावणार कॉफी विथ करणमध्ये हजेरी; भाऊ-बहिणीची जोडी पाहायला प्रेक्षक उत्सुक

Sonam Kapoor on Koffee With Karan 7 :  कॉफी विथ करण (Koffee With Karan) या कार्यक्रमामध्ये सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor)  हे हजेरी लावणार आहेत.


पाहा प्रोमो:





Pradeep Patwardhan : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली

 





काळ्या रंगाच्या साडीत खुलून दिसतंय स्मिता गोंदकरचं सौंदर्य, पाहा सुंदर फोटो...



 


‘शाका लाका बूम बूम’मधून करिअरची सुरुवात, आता बॉलिवूड अन् इंडस्ट्री गाजवतेय हंसिका मोटवानी!

साउथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी आज (8 ऑगस्ट) तिचा 31वा वाढदिवस साजरा करत आहे.  हंसिका मोटवानी आजघडीला साऊथ सिनेसृष्टीतील एक नावाजलेला चेहरा असेल, पण तिने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती.


 





'मोरूची मावशी' फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराने राहत्या घरी  निधन झाले. 'मोरूची मावशी' या  अतिशय गाजलेले नाटकात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय अनेक मालिका, चित्रपट, नाटकात त्यांचा सहभाग होता.



अवघ्या वर्षभरातच तुटलं किमचं नवं नातं, पीट डेव्हिडसनशीही केला ब्रेकअप!

किमने प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टसोबत घटस्फोट घेतल्याने ती बरीच चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्री अशाच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. कान्ये वेस्टपासून विभक्त झाल्यानंतर, किम कॉमेडियन आणि अभिनेता पीट डेव्हिडसनला डेट करत होती. परंतु, मीडिया रिपोर्टनुसार आता त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.


 





Happy Birthday Mahesh Babu : वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी करिअरची सुरुवात, वडिलांमुळे घेतला 9 वर्षाचा ब्रेक!

साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) आज (9 ऑगस्ट) त्याचा 47वा वाढदिवस साजरा करत आहे. टॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेश बाबूने वयाच्या चौथ्या वर्षी ‘नीदा’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. महेश बाबूचे वडील घटामनेनी शिवा रामा कृष्णा हे देखील तेलुगु मनोरंजन विश्वातील खूप मोठे अभिनेते होते. आजघडीला महेश बाबूची गणना साऊथमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये केली जाते.


 





मैत्री दिनाचं खास सरप्राईज! संजय जाधव यांनी केली 'पुन्हा दुनियादारी'ची घोषणा, पोस्टरही रिलीज!

'दुनियादारी' या सुपरहिट चित्रपटाच्या तब्बल 10 वर्षांनंतर दिग्दर्शक संजय जाधव 'पुन्हा दुनियादारी' हा नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.    


  


पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


रणवीर सिंहच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' मध्ये झळकणार मराठमोळी क्षिती जोग


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंहचा आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.


अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'माझा पुरस्कार सोहळा' संपन्न


ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'माझा पुरस्कार सोहळा' नुकताच दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये संपन्न झाला. ख्यातनाम अभिनेत्री निर्मिती सावंत यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं.


'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'देवा देवा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील 'केसरिया' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याने अनेक रेकॉर्ड केले. आता या सिनेमातील 'देवा देवा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.


'कार्तिकेय 2'चा ट्रेलर आऊट


'कार्तिकेय' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. 'कार्तिकेय' हा सिनेमा 2014 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे.


'दिल्ली क्राईम 2' चा दमदार ट्रेलर रिलीज


ओटीटीवरील 'दिल्ली क्राईम' या वेब सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'दिल्ली क्राईम 2'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, शेफाली शाहला या सिझनमध्ये मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करावा लागणार आहे. दिल्ली क्राईमचा पहिला सिझन हा दिल्लीमधील चर्चित निर्भया प्रकरणावर आधारित होता. आता या नव्या सिझनमधील मर्डर मिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ट्रेलरमध्ये शेफाली शाह दक्षिण दिल्लीच्या डीसीपी वर्तिका चतुर्वेदी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सिझनमधील शेफालीच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.