वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स निर्मित ‘टेनेट’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केला जाणार आहे. टेनेट 4 डिसेंबर 2020 ला इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे.


टेनेटने आतापर्यंत जगभरात 350 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. दिग्दर्शक नोलन आणि वॉर्नर ब्रदर्स यांनी 200 कोटी डॉलर्सपेक्षा अधिक बजेटवर तयार केलेल्या या चित्रपटाकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.


बॉयकॉट नेटफ्लिक्स हॅशटॅग ट्रेंडिंग, अ सुटेबल बॉय सीरीजमधल्या 'त्या' सीनमुळे ट्विटरवर वाद


कोविड -19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून खूप कौतुक मिळाले आहे. हा चित्रपट जगातील विविध भागात चांगली कामगिरी करत आहे. भारतीय प्रेक्षकांनाही चित्रपटाच्या निर्मात्यांकडून बरीच आशा आहे, त्यामुळेचं निर्मात्यांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.


आता मला कळलं भारती-हर्ष लग्नात इतकी कॉमेडी कशी करत होते; राजू श्रीवास्तव भडकला!


विशेष म्हणजे, प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री डिंपल कपाडियाला क्रिस्तोफर नोलनच्या अॅक्शन चित्रपट 'टेनेट' मध्ये कास्ट करण्यात आलं आहे. डिंपल व्यतिरिक्त रॉबर्ट पॅटीनसन आणि मायकेल केईन देखील या चित्रपटात दिसणार आहेत.