Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
'डॉक्टर असे कधीच नव्हते,अत्यंत चुकीच्या गोष्टी दाखवल्यात', 'डॉक्टर काशिनाथ घाणेकर' सिनेमावर ज्येष्ठ अभिनेत्रीने व्यक्त केली तीव्र नाराजी
Savita Malpekar on Dr. Kashinath Ghanekar Movie : सुबोध भावे (Subodh Bhave) मुख्य भूमिकेत असलेला आणि अभिजीत देशपांडे दिग्दर्शित 'आणि काशिनाथ घाणेकर' (Ani Kashinath Ghanekar) ही सिनेमा 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रंगभूमीवरचे दिग्गज कलाकार काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास उलगडला होता. पण या सिनेमात ज्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, त्या अत्यंत चुकीच्या असल्यचा आरोप ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केलाय.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
मुक्ता बर्वेचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, 'या' मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Mukta Barve: सध्या मराठी मालिकांमध्ये मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज झळकत असल्याचं चित्र असतानाच आपल्या जिवंत अभिनयानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री मुक्ता बर्वेही एका मालिकेत दिसणार आहे. कलर्स मराठीवरच्या इंद्रायणी मालिकेत साडी, गॉगल घालत ठसक्यात झालेली एन्ट्री मुक्ताच्या चाहत्यांच्या पसंतीस पडल्याचं दिसतंय.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
डेडपूल-वुल्वरीनचा ब्रोमांस, देशाच्या फाळणीच्या कहाणीसोबतच बरंच काही; 8 नव्या सीरिज 'या' आठवड्यात धुमाकूळ घालणार
NEW OTT Release: नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. मनोरंजनासाठी ओटीटीचं जग सज्ज झालं आहे. गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये कोणताही नवा चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरीही, या आठवड्यात, विशेषत: वीकेंडमध्ये ओटीटी बॉक्समध्ये बरंच काही आहे. एकीकडे निखिल अडवाणीची 'फ्रीडम ॲट मिडनाईट' ही मालिका प्रदर्शित होत आहे, जी आपल्याला भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या जवळ घेऊन जाते, तर दुसरीकडे मार्व्हलचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'डेडपूल आणि वूल्व्हरिन' देखील आता उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे 'कोब्रा काई' या सुपरहिट मालिकेचा नवा सीझन, 8 चित्रपट आणि 'रॉब पीस' ते 'से नथिंग' सारख्या सीरिजही प्रदर्शित होत आहेत.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
'सिंघम अगेन' लिहिणाऱ्या मराठी लेखकाचं अभिनेत्याने केलं कौतुक, म्हणाला, 'डायलॅागबाजी नाही तर नितीमत्तेचे संदेश...'
Sigham Again : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'सिंघम अगेन' (Singham Again) हा सिनेमा सध्या बराच चर्चेत आहे. सिनेमाची कथा, गाणी, अॅक्शन आणि आशय या सगळ्यामुळे बॉक्स ऑफिसवरही सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. तसेच आता या सिनेमाची कथा लिहिणाऱ्या मराठी लेखकाचंही बरंच कौतुक केलं जातंय. क्षितीज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) सिंघम अगेनची कथी लिहिली आहे. त्याच्यासाठी अभिनेता पृथ्वीक प्रतापने (Prithvik Pratap) सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
कोरियन इंडस्ट्री हादरली; कोरियन ड्रामा अॅक्टर Song Jae Rim चं निधन, राहत्या घरात आढळला मृतदेह
Song Jae Rim Death: दक्षिण कोरियाचा (South Korea) लोकप्रिय अभिनेता सोंग जे रिम (Song Jae-Rim) याचं वयाच्या 39 व्या वर्षी निधन झालं आहे. 12 नोव्हेंबर रोजी त्याचं राहत्या घरी निधन झालं. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सोंग जे रिम 'द मून एम्ब्रेसिंग द सन' आणि 'क्वीन वू' या गाजलेल्या के-ड्रामामध्ये झळकला होता. यामुळे त्याला जगभरात ओळख मिळाली होती. आपल्या लाडक्या कोरियन स्टारनं अचानक जगातून एग्झिट घेतल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. सोंग जे रिम यांच्या निधनानं जगभरातील चाहते शोकसागरात बुडाले आहेत.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
50 लाख दे नाहीतर...; शाहरुख, सलमाननंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी
बाबा सिद्दिकींच्या (Baba Siddique) हत्येनंतर अनेक सेलिब्रिटींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बॉलिवूडचा दबंग सलमान खानला (Salman Khan) तर दिवसागणिक धमक्या येत आहेत. त्यानंतर बॉलिवूडचा किंग शाहरुख खानलाही (Shah Rukh Khan) जीवे मारण्याची धमकी आली आहे. अशातच आता शाहरुख, सलमाननंतर एका प्रसिद्ध अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अभिनेत्रीला एका अज्ञात नंबरवरुन फोन आला होता. फोन करणाऱ्यानं तिच्याकडे 50 लाखांची मागणी केली असून जर पैसे दिले नाहीतर, तिला जीवेमारलं जाईल, असं देखील सांगितलं होतं.