Savita Malpekar on Dr. Kashinath Ghanekar Movie : सुबोध भावे (Subodh Bhave) मुख्य भूमिकेत असलेला आणि अभिजीत देशपांडे दिग्दर्शित 'आणि काशिनाथ घाणेकर' (Ani Kashinath Ghanekar) ही सिनेमा 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रंगभूमीवरचे दिग्गज कलाकार काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास उलगडला होता. पण या सिनेमात ज्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, त्या अत्यंत चुकीच्या असल्यचा आरोप ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केलाय.
सविता मालपेकर यांनी अनेक नाटकांमधून डॉक्टरांसोबत काम केलं आहे. त्यामुळेच ज्या गोष्टी सिनेमात दाखवल्या आहेत, तसा वैयक्तिक अनुभव मल कधीच आला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आशालता यांनीही अगदी रडत येऊन हा सिनेमा आपण पाहायचा नाही असं मला ठणकावून सांगितल्याचंही त्यांनी म्हटलं. पण परीक्षकाच्या भूमिकेत त्यांना हा सिनेमा पाहावा लागला. त्याचवेळी सिनेमात दाखवलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचं त्यांनी दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांन सांगितलं होतं.
'हे अजिबात आवडलं नाहीये, फार चुकीचं दाखवलंय'
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, 'आज आशालता नाहीये आणि आशालताने डॉक्टरांसोबत खूप काम केलंय. जवळपास 1500 प्रयोग तिने केले आहेत. ती माझ्याजवळ आली आणि रडली म्हणाली सविता आपण डॉ.काशिनाथ घाणेकर सिनेमा बघायचा नाही. तू गेलीस बघायला तर बघ.. म्हटलं का काय झालं? ती म्हणाली डॉक्टर असे होते का? सिनेमात पहिलंच वाक्य असं बोललं गेलंय जे अत्यंत चुकीचं आहे. डॉक्टर काशिनाथ घाणेकर ही रंगभूमीला लागलेली किड आहे, असं वाक्य आहे त्या सिनेमात.
पुढे त्यांनी म्हटलं की, मला तो सिनेमा पाहायचा नव्हता. पण मी एका ठिकाणी परीक्षण होते म्हणून मला तो बघायला लागला. तेव्हा मी अभिजीत देशपांडेंना म्हटलंही, हे अजिबात आवडलं नाहीये, फार चुकीचं तुम्ही दाखवलंय. पहिली गोष्ट तर त्यावेळी रस्त्यावर बसून कोणी दारु प्यायचे नाहीत. डॉक्टर शौकिन होते, पण ते त्यांच्याच ऑरोमध्ये असायचे. मी जितकं काम केलं आहे त्यांच्यासोबत, मी जितकं त्यांना ओळखते मला कधीच तो अनुभव आला नाही.