Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


 


Mrunal Dusanis : 'मी बोल्ड सीन्स करेन पण...', आजवर सोज्वळ व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मृणालने मांडली स्पष्ट भूमिका



Mrunal Dusanis :  अभिनेत्री म्हटलं की, प्रत्येक आशयाच्या भूमिका ह्या कराव्या लागतात. कधी ती सोज्वळ व्यक्तिरेखा असेल, कधी खलनायिका असेल किंवा कधी बोल्ड सीन्स असतील. या प्रत्येक भूमिकेला न्याय देणं महत्त्वाचं असतं. पण बऱ्याचदा अभिनेत्रींची एखादी ओळख झाली तर त्याच अभिनेत्रीला प्रेक्षक सहसा दुसऱ्या भूमिकेत पाहणं पसंत करत नाहीत. म्हणजे जर एखाद्या अभिनेत्रीने सोज्वळ व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांची मनं जिंकली असतील,तर तिचे बोल्ड सीन्स फारसे पसंतीस उतरत नसल्याचं पाहायला मिळतंय. याचसगळ्यावर अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) हीनेही भाष्य केलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Biopic On Cricketer Balu Panwalkar: भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने घायाळ करणाऱ्या क्रिकेटपटूची कहाणी रुपेरी पडद्यावर



Biopic On Cricketer Balu Panwalkar:  आपल्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना गुंडाळणारे भारताचे पहिले दलित क्रिकेटपटू बाळू पालवणकर ( Balu Panwalkar) अर्थात पी. बाळू (P. Balu) यांचा  जीवनपट आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. बाळू पालवणकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय क्रिकेट चांगलेच गाजवले होते. अस्पृश्यतेचे चटके सोसूनही त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांवर भुरळ पाडली होती. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया (Tigmanshu Dhulia) या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. बाळू पालवणकरांची भूमिका अजय देवगण साकारणार आहेत की इतर अभिनेता झळकणार आहे, याबाबत काहीही स्पष्ट झाले नाही. 


 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Mirzapur 3 Ali Fazal Hints Release Date :  'पंचायत-3' मध्ये लपली आहे 'मिर्झापूर-3' च्या रिलीजची डेट, गुड्डू भैय्याने दिली हिंट



Ali Fazal Hints Mirzapur 3 Release Date:   ओटीटीवर धुमाकूळ घालणारी वेब सीरिज  'मिर्झापूर'च्या (Mirzapur)  तिसऱ्या सीझनची चाहत्यांना प्रतीक्षा लागली आहे. मिर्झापूर 3 ही वेब सीरिज आता लवकरच जाहीर होऊ शकते. या वेब सीरिजच्या रिलीज डेट बाबत फारशी माहिती समोर आली नसली तरी मिर्झापूरचे कलाकार रिलीज डेटची हिंट देत आहेत. ,


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie : अंतरवालीत लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला? "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटात समोर येणार सत्य?


Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie :    मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" ( Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil ) चित्रपट पु्न्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आला. अंतरवाली सराटीमधील उपोषण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा जोमाने पेटले. "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील"  चित्रपटात या लाठीचार्जचे चित्रण आहे. या लाठीचार्जचा आदेश कोणी दिला, याचा दावा चित्रपटातून होण्याची शक्यता आहे. ,


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Manoj Bajpayee On Satya Movie : पाचव्याच दिवशी थांबले होते 'सत्या'चे शूटिंग, अंडरवर्ल्डला घाबरून पळून गेला होता निर्माता, अन् मग...


Manoj Bajpayee On Satya Movie :  भारतीय सिनेसृष्टीत गुन्हेगारी जगत, अंडरवर्ल्डवर अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले. यातील काही चित्रपटांनी आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma ) दिग्दर्शित 'सत्या'  (Satya Movie) हा चित्रपटही याच पठडीतील आहे. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने इतिहास घडवला, शिवाय बॉलिवूडला अनेक दमदार कलाकार दिले. मात्र, या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशीच शूटिंग बंद करावी लागली होती. अंडरवर्ल्ड जगतावर चित्रीत होणाऱ्या चित्रपटाच्या निर्मात्याने अंडरवर्ल्डच्या भीतीने पळ काढला होता. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...