Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Nita Ambani : नीता अंबानी यांचा 'विश्वंभरी स्तुति'वर मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स, देवीकडे मागितला आशीर्वाद; व्हिडीओ व्हायरल


रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी  (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंगचा शाही कार्यक्रम गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सेलिब्रेटींपासून ते अंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परफॉर्मन्स सादर केले. मात्र,  नीता अंबानीच्या परफॉर्मन्सने आपली वेगळीच छाप सोडली. परंपरा आणि अध्यात्म यांचा मेळ साधताना नीता अंबानी यांनी विश्वंभरी स्तुतीवर एक मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Rinku Rajguru : तुमची मुलगी असती तर तुम्हाला चाललं असतं का? भर कार्यक्रमातून बाहेर जाताना आर्ची चाहत्यांवर भडकली


 जळगावांत शासनाकडून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला सैराट फेम रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) हीने हजेरी लावली. तिला पाहण्यासाठी जळगावात (Jalgaon) आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चाहत्यांची बरीच गर्दी पाहायला मिळाली. पण या गर्दीतून बाहेर जाताना मात्र आर्ची चिडल्यांच पाहायला मिळालं. गर्दीतून बाहेर पडताना एका चाहत्याचा धक्का रिंकुला लागला. त्यामुळे रिंकु चिडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Manoj Jarange Sangharsh Sangharsh Yodha : 'बायकोला सांगितलंय, आलो तर तुझा...गेलो तर समाजाचा; मनोज जरांगे यांच्या आयुष्यावरील 'संघर्ष योद्धा'चा धमाकेदार टीझर लाँच, पाहा व्हिडीओ


 मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर निर्णायक आंदोलन उभारणारे  मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या 'संघर्ष योद्धा' (Sangharsh Yodha) चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. मराठा समाजाचे प्रश्न, आरक्षणाची मागणी आणि त्यासाठी मनोज जरांगे यांनी उभे केलेले आंदोलन या भोवती चित्रपट बेतला असल्याचे टीझरवरून स्पष्ट होत आहे.  


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Premachi Goshta Latest Episode : मुक्ताच्या प्रेमासाठी सागरची किचनमध्ये धडपड; आदित्यसाठी मुक्ता घेणार मोठा निर्णय, सावनीचा जळफळाट


'प्रेमाची गोष्ट'  (Premachi Goshta)  मालिकेत सध्या रोमँटिक वळण आले आहे.  स्वाती-कार्तिकचा संसार वाचवल्यानंतर मुक्ताबद्दल सागरच्या मनात आदर वाढला असून आता प्रेम निर्माण होऊ लागले आहे. मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी सागरची किचनमध्ये धडपड  करणार आहे. तर,दुसरीकडे मुक्ता आदित्यला मदत करण्यासाठी निर्णय घेते. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Diljit Dosanjh Anant Radhika Pre Wedding : वन्स मोअर...20 मिनिटं तरी परफॉर्मन्स करा, अनंत अंबानींचा आग्रह; दिलजीतच्या गाण्यावर शाहरुख, करीना थिरकले; पाहा व्हिडीओ


 रिलायन्स समुहाचे सर्वसर्वो मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani)  यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी  (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला सेलिब्रेटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमात बॉलीवूड स्टार्सच्या चमकदार परफॉर्मेन्सने धमाल आणली. सोशल मीडियावर दिलजीत दोसांझच्या स्टेज शोची झलक समोर आली आहे.  करिनाव्यतिरिक्त करिश्मा कपूर त्याच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. काही व्हिडिओंमध्ये शाहरुख खानही दिलजीतसोबत स्टेजवर दिसत आहे. तर, अनंत अंबानी यांनीदेखील दिलजीतकडे वन्स मोअरची मागणी केली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा