Diljit Dosanjh Anant-Radhika Pre Wedding :  रिलायन्स समुहाचे सर्वसर्वो मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani)  यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी  (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला सेलिब्रेटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमात बॉलीवूड स्टार्सच्या चमकदार परफॉर्मेन्सने धमाल आणली. सोशल मीडियावर दिलजीत दोसांझच्या स्टेज शोची झलक समोर आली आहे.  करिनाव्यतिरिक्त करिश्मा कपूर त्याच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. काही व्हिडिओंमध्ये शाहरुख खानही दिलजीतसोबत स्टेजवर दिसत आहे. तर, अनंत अंबानी यांनीदेखील दिलजीतकडे वन्स मोअरची मागणी केली आहे. 


अनंत अंबानी म्हणाले, वन्स मोअर... 


गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनचे आयोजन करण्यात आले होते. या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये हॉलिवूड पॉप सिंगर रिहानाचा धमाकेदार परफॉर्मन्स सादर केला. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, इतर स्टार्सचा भव्य परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पंजाबी गायक दिलजीत दोसांझने ही धमाकेदार परफॉर्मन्स सादर केला. अनंत अंबानी यांनी तर दिलजीतला आणखी 20 मिनिटे परफॉर्म करावा अशी आग्रहाची मागणी केली. 






दिलजीतच्या गाण्यावर थिरकले सेलेब्स...


या प्री-वेडिंग फंक्शनची सुरुवात हॉलिवूड पॉप सिंगर रिहानाच्या परफॉर्मेन्सने झाली. रिहानाच्या परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर दोन दिवसांमध्ये बॉलीवूड सेलिब्रेटींनीदेखील जामनगरमध्ये धमाल केली आणि जवळपास सर्वांनी स्टेज परफॉर्मन्सही केला. दिलजीतच्या गाण्यांवर करीना स्टेजवर जबरदस्त डान्स करत असताना करिश्मा कपूरही त्याच्या गाण्यांवर डान्स करताना दिसली.






 


नीता अंबानी यांचा 'विश्वंभरी स्तुति'वर मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स 


अनंत अंबानी  (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंगचा शाही कार्यक्रम गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सेलिब्रेटींपासून ते अंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परफॉर्मन्स सादर केले. मात्र,  नीता अंबानीच्या परफॉर्मन्सने आपली वेगळीच छाप सोडली. परंपरा आणि अध्यात्म यांचा मेळ साधताना नीता अंबानी यांनी विश्वंभरी स्तुतीवर एक मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.