Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..
Bigg Boss Marathi Season 5 Latest News : ''हे असले चाळे करुन टीआरपी इथूनच...'' बिग बॉस मराठीच्या प्रोमोवर प्रेक्षकांचा संताप
छोट्या पडद्यावर आता 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi Season 5) या रिएल्टी शोचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास दोन वर्षानंतर बिग बॉस मराठीचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉस मराठीचा होस्ट अभिनेता रितेश देशमुख असणार आहे. दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांच्या ऐवजी आता रितेशकडे शोची धुरा असल्याने बिग बॉसच्या यंदाचा सीझन कसा असणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. यंदा बिग बॉसच्या घरात कोण असणार, याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कलर्स मराठी वाहिनीवर स्पर्धकांबाबत हिंट देणारी पोस्ट केली जात आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे प्रोमोदेखील रिलीज केले जात आहेत. त्याच एका प्रोमोवर आता प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Manoj Jarange : छत्रपतींचं महानाट्य दाखवलं हा गुन्हा केला का? अटक वॉरंट जारी केल्यानंतर मनोज जरांगेंचा सवाल
'शिवछत्रपतींच्या नाटकासाठी मी तुरुंगात जायला तयार आहे', असं म्हणत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाट्यनिर्मात्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. न्यादंडाधिकारी ए.सी बिराजदार यांनी हे अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच यावेळी मनोज जरांगे यांनी सांस्कृतिक मंत्रालयावरही काही सवाल उपस्थित केले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Mamta Kulkarni Drug Case : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीला हायकोर्टाचा दिलासा
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं (Mamta Kulkarni ) गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेतील कागदपत्रं गहाळ झाल्यानं अखेर हायकोर्टानं ममता कुलकर्णीला दिलासा देऊ केलाय. वर्ष 2016 मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेत्री ममता कुलकर्णीनं मुंबई उच्च न्यायालयात वर्ष 2018 मध्ये ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील काही कागदपत्रं गहाळ झाल्यानं त्यावर अनेक वर्ष सुनावणी होऊ शकली नव्हती.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Bigg Boss Marathi: 'वेड' लावणारा कोणता अभिनेता बिग बॉसच्या घरात जाणार? कलर्स मराठीच्या पोस्टमुळे 'या' अभिनेत्याच्या नावाच्या चर्चा
बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पाचवा सिझन येत्या 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सिझनमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्यातच अनेक कलाकारांची नावं या यादीमध्ये समोर येतायत. पण हे कलाकार खरंच सहभागी होणार का? हे येत्या 28 जुलै रोजीच स्पष्ट होईल. यामध्ये आता अभिनेता शुभंकर तावडेचंही (Shubhankar Tawade) नाव समोर आलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Bollywood : स्टारकिडला सिनेमात घेतल्यानंतर दिग्दर्शकाचं नशीबच फळफळलं, लेकीसाठी अभिनेत्याने थेट बंगलाच गिफ्ट केला
स्टारकिड्सना सिनेमात कास्ट करणं, तसेच त्यांना सिनेमात काम मिळवून देणयासाठी अभिनेत्यांनी घेतलेल्या कष्टांची बऱ्याचदा चर्चा होत असते. स्वत:च्या मुलांसाठी अनेकदा हे अभिनेते सिनेमांची निर्मिती देखील करतात. त्यातच आता कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबराने देखील असाच एक स्टारकीडचा अनुभव सांगितला आहे. अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांच्यासोबतचा एक प्रसंग मुकेश छाबराने सांगितला आहे.