मुंबई : 'झी मराठी'वर (Zee Marathi) सोमवार 12 फेब्रुवारीपासून 'शिवा' आणि 'पारु' या दोन्ही नव्या कोऱ्या मालिका भेटीला येणार आहेत. या दोन्ही मालिकांची गोष्ट नेमकी काय असणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागली असल्याचं पाहायला मिळतंय. या दोन्ही मालिकांच्या प्रोमोमध्ये मराठी सिनेसृष्टीतल्या दोन दिग्गज अभिनेत्री पाहायला मिळाल्या आहेत. अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी या दोन अभिनेत्री या मालिकांच्या प्रोमोमध्ये झळकल्या.






झी मराठीवर सुरु होणाऱ्या या दोन्ही मालिकांमुळे झी सध्या सुरु असलेली सारं काही तिच्यासाठी या मालिकेची वेळ बदलण्यात येणार आहे. सोमवारपासून ही मालिका रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या दोन्ही मालिकांमध्ये दोन नव्या जोड्या पाहायला मिळणार आहेत. पारु या मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री शरयू सोनावणे हे दोघे मुख्य भूमिकेत असणार आहेत. तर शिवा या मालिकेत अभिनेता शाल्व खिंजवडेकर आणि अभिनेत्री पूर्वा फडके छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. 


संध्याकाळी 7.30 वाजता 'पारु' येणार प्रेक्षकांच्या भेटीला


पारु ही मालिका 12 फेब्रुवारीपासून संध्याकाळी 7.30 वाजता आणि शिवा ही मालिका संध्याकाळी 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो या मालिकेमधील अभिनेत्री शरयू सोनावणे ही पारु या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच या मालिकेमध्ये अभिनेता प्रसाद जवादे हा आदित्य किर्लोस्करची प्रमुख भूमिका साकारणार आहे. 






'या' अभिनेत्याचं कमबॅक


काही वर्षांपूर्वी झी मराठीवर आलेल्या येऊ तशी कशी मी नांदायला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ओम म्हणजेच अभिनेता शाल्व खिंजवडेकर या शिवा या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच शिवा भूमिकेतच अभिनेत्री पूर्वा फडके ही मुख्य भूमिकेत दिसरणार आहे. सोमवार 12  फेब्रुवारी पासून शिवा रात्री 9 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 






ही बातमी वाचा : 


Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेबाबत झी मराठीचा मोठा निर्णय; दिली मोठी अपडेट