Bus Bai Bus : 'मी घेऊन आलो आहे महिलांसाठी खास राखीव बस' असं सुबोध भावे (Subodh Bhave) याने म्हंटल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरु झाली आणि प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या कार्यक्रमाची. हा कार्यक्रम 29 जुलैपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री 9.30 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुबोध भावे करणार असून, या कार्यक्रमात महिला कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र सुरु असताना सोशल मीडियावर सुबोध भावेचे भन्नाट सवाल जवाब प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.


जसं की, 'हॉटेलमधू न साबण, शाम्पू घरी घेऊन जात का?', 'तुम्ही पाणीपुरी खाल्ल्यावर सुकी पुरी मागता का?'. या धमाल प्रश्नावर नेटिझन्सचा तुफान प्रतिसाद तर मिळतोच आहे, पण त्याचसोबत अशी एक गोष्ट ज्याच्याशिवाय सोशल मीडिया अपूर्ण आहे ती म्हणजे मिम्स, ते देखील या सवाल जवाबवर बनताना दिसत आहेत. जर कार्यक्रमाच्या प्रसारणाआधीच सोशल मीडियावर इतकी चर्चा आहे, तर कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आल्यावर त्याला भरगोस प्रतिसाद मिळणार यात काही शंका नाही.


'बस बाई बस' हटके कार्यक्रम


सुबोध भावे प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करत असतो. आता सुबोध स्त्रियांसाठी लेडीज स्पेशल बस घेऊन येणार आहे. ही बस महिलांसाठी विशेष असणार आहे. सुबोधचा 'बस बाई बस' हा कार्यक्रम हटके असणार आहे. या कार्यक्रमाची महिलावर्गात क्रेझ दिसून येत आहे.


'बस बाई बस'चा टीझर आऊट


'बस बाई बस' या कार्यक्रमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा कार्यक्रम नक्की कसा असणार आणि काय धम्माल मज्जा मस्ती होणार यासाठी प्रेक्षकांना 29 जुलैची वाट बघावी लागणार आहे. कारण, हा कार्यक्रम 29 जुलैपासून प्रेक्षकांना झी मराठीवर शुक्रवारी आणि शनिवारी साडे नऊ वाजता पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता 29 जुलैची आतुरतेने वाट पाहत आहेत.


हेही वाचा :


Bus Bai Bus : सुबोध भावे महिलांसाठी घेऊन येतोय खास राखीव बस; 'बस बाई बस'चा टीझर आऊट


Subodh Bhave : सुबोध भावेने राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचे मानले आभार