Bus Bai Bus : 'तुला पाहते रे' ही छोट्या पडद्यावरची मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील विक्रांत सरंजामे आजही प्रेक्षकांना भुरळ घालतो आहे. आता तीन वर्षांनंतर सुबोध भावे (Subodh Bhave) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. सुबोधचा 'बस बाई बस' (Bus Bai Bus) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


सुबोध भावे प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करत असतो. आता सुबोध स्त्रियांसाठी लेडीज स्पेशल बस घेऊन येणार आहे. ही बस महिलांसाठी विशेष असणार आहे. सुबोधचा 'बस बाई बस' हा कार्यक्रम हटके असणार आहे. या कार्यक्रमाची महिलावर्गात क्रेझ दिसून येत आहे. 






'बस बाई बस'चा टीझर आऊट


'बस बाई बस' या कार्यक्रमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा कार्यक्रम नक्की कसा असणार आणि काय धम्माल मज्जा मस्ती होणार यासाठी प्रेक्षकांना 29 जुलैची वाट बघावी लागणार आहे. कारण हा कार्यक्रम 29 जुलैपासून प्रेक्षकांना झी मराठीवर शुक्रवारी आणि शनिवारी साडे नऊ वाजता पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता 29 जुलैची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


संबंधित बातम्या


Ekda Kay Zala : कौतुकास्पद! 'एकदा काय झालं'च्या शूटिंगदरम्यान 'प्लॅस्टिक बंदी', प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळला


Darlings Official Teaser : 'क्या एक मेंढक और बिच्छू दोस्त हो सकते है?'; डार्लिंग्सचा धमाकेदार टीझर रिलीज