Nave Lakshya : स्टार प्रवाहवरील (Star Pravah) मालिकांना सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चॅनलवरील रंग माझा वेगळा,फुलाला सुगंध मातीचा आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या स्टार प्रवाहवरील मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. नवे लक्ष्य (Nave Lakshya) मालिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता नवे लक्ष्य चित्रपटातील युनिट-9 ला पोलिसांची साथ मिळणार आहे. 


स्टार प्रवाहवरील नवे लक्ष्य मालिकेतील युनिट 9 नवनव्या गुन्ह्यांचा शोधतपास करत असतात. यावेळी युनिट 9 च्या टीमला मिळणार आहे जाबाज पोलिसांची साथ. स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील एएसपी कीर्ती, लग्नाची बेडी मालिकेतील एसपी राघव आणि अबोली मालिकेतील सीनियर पीआय अंकुश एका सेक्स स्कॅण्डलच्या तपासासाठी युनिट 9 च्या टीमची साथ देणार आहेत. त्यामुळे या मालिकेच्या पुढील भागांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


निष्पाप मुलींना फसवणाऱ्या गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी हे पोलीस अधिकारी एकत्र आले आहेत. येत्या रविवारी म्हणजेच 24 जुलैला दुपारी 1 वाजता, सायंकाळी 7  वाजता आणि रात्री 10 वाजता हा विशेष भाग प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.


आतापर्यंत या पोलीस अधिकाऱ्यांना आपण त्यांच्या मालिकांमध्ये गुन्ह्यांचा तपास करताना पाहिलं आहे. मात्र नवे लक्ष्य मालिकेच्या निमित्ताने हे सगळे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यामुळे महाएपिसोडची रंगत वाढणार हे नक्की. लक्ष्य मालिकेचा महाएपिसोड 24 जुलैला दुपारी 1 वाजता, सायंकाळी 7  वाजता आणि रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षक पाहू शकतात. 


हेही वाचा: