Yeh Rishta Kya Kehlata Hai : छोट्या पड्यावर सध्या अनेक नव्या मालिका सुरु होत आहेत. त्यातच जुन्या मालिकांची गोष्ट संपवून नव्या गोष्टी वाहिनीवर सुरु होत आहे. पण असेही काही कार्यक्रम आहेत, जे अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतायत. याच कार्यक्रमामधील एक कार्यक्रम म्हणजे स्टार प्लस (Star Plus) वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) कार्यक्रम. ही मालिका 2009 मध्ये सुरु झाली होती. 


ही मालिका सुरु होताच, ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली  आणि ही मालिका टीआरपीमध्येही अव्वल होती. पण आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वर्ष सलग या मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण आता ही मालिका बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर निर्मात्यांनी देखील स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. 


निर्मात्यांनी सांगितलं कारण


स्टार प्लसची लोकप्रिय मालिका ये रिश्ता क्या कहलाता हैं बंद होणार असल्याच्या बातम्या सध्या समोर आल्या आहेत. या मालिकेचे निर्माते रंजक शाही यांनी याबाबत चर्चा देखील केली. बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, त्यांनी म्हटलं की, 'ही मालिका माझ्यासाठी लहान मुलासारखी आहे. मागील अनेक वर्षांपासून ही मालिका टॉप 5 मध्ये आहे. या काळात आपण अनेक चढउतारही पाहिले आहेत. अनेकदा असे घडले आहे की शोचा टीआरपी खाली गेला आहे, ज्यासाठी आम्हाला ट्रोल देखील केले गेले.आम्हाला प्रोग्रामिंग टीमने मालिका बंद करण्याची नोटीस दिली आहे. पण जेव्हा मालिका ऑफ एअर करण्याची नोटीस मिळाली, तेव्हा मालिकेचा टीआरपी वाढला.' 


मालिकेने दिली अनेक कलाकारांना ओळख


ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकने अनेक वर्षांपासून केवळ प्रेक्षकांचं मनोजरंजनच केलं नाही तर अनेक कलाकारांना ओळख देखील मिळवून दिली. या शोने हिना खान, करण मेहरा, शिवांगी जोशी आणि प्रणाली राठौर यांसारख्या अनेक स्टार्सना लोकप्रिय बनवले आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता'नंतर या सर्व स्टार्सच्या करिअरला सुरुवात झाली आणि ते त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती करत आहेत. दरम्यान आता ही मालिका कधी ऑफ एअर जाणार याबाबत अद्याप माहिती समोर आली नाहीये. त्यामुळे ही मालिका ऑफ एअर गेली तर स्टारवर कोणती नवी मालिका सुरु होणार, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Sanjay Mone on Sharad Ponkshe : 'नथुरामच्या भूमिकेसाठी शरदला पुरस्कार न देणं ही चुकच', संजय मोनेंचं व्यक्त केलं स्पष्ट मत