Tanmay Vekaria Struggle Story : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील पात्र, कथानक सर्व गोष्टींची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेचं छोट्या पडद्यावर अनेक वर्षांपासून राज्य आहे. या कार्यक्रमातील अनेक कलाकार रातोरात सुपरस्टार झाले होते. 700 रुपयांची नोकरी करणाऱ्या एका अभिनेत्याचं नशीब पालटलं आणि तो रातोरात स्टार झाला होता. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील पात्र आज घराघरांत ओळखली जात आहेत. यात तन्मय वेकरिया (Tanmay Vekaria) या अभिनेत्याचा समावेश आहे. तन्मयने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघा हे पात्र साकारले आहे. या मालिकेतील बाघाचं पात्र खूपच भन्नाट आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र तो अजिबातच बाघासारखा नाही.
तन्मय वेकरियाने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून तो खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला. तन्मय म्हणतो, आज लोक मला माझ्या खऱ्या नावापेक्षा 'बाघा' या नावाचेच ओळखतात. तन्मयसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
कोण आहे तन्मय वेकरिया? (Who is Tanmay Vekaria)
तन्मय वेकरियाचा जन्म 1981 मध्ये गुजरातमध्ये झाला. एका गुजराती मध्यमवर्गीय कुटुंबात तन्मयचा जन्म झाला. तन्मयचा छोटा भाऊ सीए म्हणून काम करतो. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तन्मयने रंगभूमीवर पदार्पण केलं. अभिनेता होण्याची तन्मयची इच्छा होती. वयाच्या 30 व्या वर्षी तन्मय लग्नबंधनात अडकला. प्रचंड मेहनतीनंतर तन्मयला अखेर यश मिळालं.
तन्मय वेकरियाचा संघर्षमय प्रवास
तन्मय वेकरियाने गुजरातमधील रंगभूमीवर काम करत आपल्या अभिनयप्रवासाची सुरुवात केली. रंगभूमीवर जास्त पैसे मिळत नसल्याने त्याला नोकरी करावी लागली. तन्मयचा पहिला पगार 700 रुपये होता. नोकरी करता करता तो थिएटर करत असे. करिअरच्या सुरुवातीला त्याने दिलीप जोशीच्या नाटकात दिशा वकानीसोबत काम केलं होतं. 10 वर्षे तो छोटी-मोठी कामे करत होता. दरम्यान त्याला नैराश्याचा सामना करावा लागला.
अन् तन्मय रातोरात सुपरस्टार झाला...
तन्मयला 2010 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका मिळाली. या मालिकेच्या माध्यमातून तो रातोरात सुपरस्टार झाला. तन्मय वेकरियाने 'ढूंढते रह जाओगे',एफआईआर','भले पधार्या','समय चक्र' आणि 'घर घर की बात' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
संबंधित बातम्या