एक्स्प्लोर

Divya Bhatnagar Death | 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनानं निधन

Divya Bhatnagar Death : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ती 34 वर्षांची होती. पहाटे 3 वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.

Divya Bhatnagar Death : टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या भटनागरचं सोमवारी सकाळी निधन झालं आहे. रिपोर्ट्सनुसार, दिव्या गेल्या काही दिवसांपासून दिव्याची प्रकृती गंभीर असून ती झुंज देत होती. त्यानंतर सोमवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. ती 34 वर्षांची होती. दिव्याला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर तिला गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिव्या भटनागर 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'गुलाबो' यांसारख्या टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहचली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिव्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर न्युमोनिया झाला होता. त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेली. तिचा ऑक्सिजन लेव्हलही कमी होत गेली होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. व्हेंटिलेटरवर गेल्या अनेक दिवसांपासून ती झुंज देत होती. अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली आहे.

दिव्या भटनागरचा मित्र युवराज रघुवंशीने अभिनेत्रीच्या निधनाचं वृत्त दिलं. स्पॉटबॉयशी बातचित दरम्यान, युवराजने सांगितलं की, 'दिव्याचं निधन पहाटे 3 वाजता झालं आहे. दिव्याला 7 हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. रात्री अचनाक 2 वाजता तिची प्रकृती आणखी खालावली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर 3 वाजता डॉक्टरांनी दिव्याचं निधन झालं असल्याचं जाहीर केलं. हे वृत्त माझ्या आणि दिव्याच्या कुटुंबासाठी मोठा धक्का होता. देव तिच्या आत्म्यास शांती देवो.'

दिव्याची मैत्रीण आणि अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहित दिव्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने लिहिलं आहे की, "जेव्हा कोणीच कोणासोबत नव्हतं तेव्हा केवळ तूच असायचीस. दिवु तूच माझी होतीस, जिच्यावर मी रागावू शकत होते, रुसू शकत होते, माझ्या मनातल्या गोष्टी सांगू शकत होते. मला माहित आहे की, आयुष्यात तू खूप अडचणींचा सामना केलास. परंतु, आता मला माहिती आहे की, तू एका चांगल्या ठिकाणी आहे, जिथे दुःख, वेदना, खोटं यांसारखं काहीच नाहीये. तू सदैव स्मरणात राहशील दिवू. आणि तुलादेखील माहित आहे की, तुझ्यावर मी प्रेम करते आणि तुझी काळजी करत होते. मोठी तू होतीस, पण लहानही मुलगीही तूच होतीस. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो. जिथे कुठे आहेस तिथे आनंदी राहा. तू खूप लवकर निघून गेली मैत्रिणी."

महत्त्वाच्या बातम्या

Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
Shashank ketkar Zee Marathi Serial: झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
Aai Tuljabhavani Colors Marathi: उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Embed widget