Sushant Singh Rajput dance video : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची फॅन फॉलोविंग प्रचंड होती. मात्र, त्याने आयुष्य संपवल्यानंतर अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी आलेलं देखील पाहायला मिळालं होतं. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या राय आणि सुशांत सिंह राजपूत यांचा एक जुना डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, जो त्यांचे चाहते मोठ्या भावुकतेने शेअर करत आहेत. हा व्हिडिओ 2006 साली मेलबर्नमध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या समारोप समारंभाचा आहे. या कार्यक्रमात ऐश्वर्या राय हिने भारताचं प्रतिनिधित्व करत एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला होता. त्याच वेळी, सुशांत सिंह राजपूत देखील त्या स्टेजवर बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसून येतो.
संघर्षाच्या काळातील क्षण
हा व्हिडिओ त्या काळातील आहे, जेव्हा सुशांत अजून बॉलिवूडमध्ये स्थिरावला नव्हता, आणि संघर्ष करत होता. त्यामुळे हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसाठी अधिकच खास आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, सुशांत अत्यंत जोशात आणि ऊर्जा भरलेल्या अंदाजात डान्स करत आहे. विशेष म्हणजे, एका क्षणात तो ऐश्वर्या राय हिला इतर डान्सर्ससोबत उचलताना दिसतो.
सुशांतने शेअर केलेला एक मजेशीर किस्सा
या परफॉर्मन्सविषयी सुशांतने एका मुलाखतीत एक मजेदार किस्सा शेअर केला होता. त्याने सांगितलं होतं की त्याच्या भूमिकेमध्ये ऐश्वर्या राय यांना उचलण्याचं काम होतं. त्यांनी ते यशस्वीरित्या केलं, पण परफॉर्मन्सच्या शेवटी त्यांना खाली सोडायचं विसरला! जवळपास एक मिनिट त्यांनी त्या स्थितीतच ठेवले, ज्यामुळे ऐश्वर्या राय थोडी आश्चर्यचकित झाली होती. यानंतर कॉलेजमध्ये सुशांत अचानक लोकप्रिय झाला होता.
एक प्रेरणादायी प्रवास
सुशांत सिंह राजपूत यांनी इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर अभिनयात रस निर्माण झाला आणि त्यांनी टीव्ही मालिकांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. "पवित्र रिश्ता" या मालिकेमुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. त्यानंतर 2013 साली "काय पो छे!" या चित्रपटातून त्यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश झाला.
शानदार पदार्पणानंतर त्यांनी "एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी", "केदारनाथ", आणि "छिछोरे" यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, 2020 मध्ये मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली, आणि हे ऐकून त्यांच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला. आजही त्याचे चाहते त्यांच्या जुन्या व्हिडिओंमधून त्याला आठवत राहतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या