Kajol : बॉलिवडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा  (Tanuja)  आणि काजोल (Kajol) या दोघी 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati)  च्या मंचावर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. ये दिल्लगी, करण अर्जुन, डीडीएलजे, गुप्‍त, कभी खुशी कभी गम,  माय नेम इज खान आणि फना यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या काजोलला इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं असं तिनं कोण होणार करोडपतीमध्ये सांगितलं. अभिनय नाही तर एका ऑफिसमध्ये जाऊन नोकरी करायची इच्छा होती, असंही यावेळी काजोल म्हणाली. 


काजोल म्हणाली, 'नोकरी करायची होती'
कोण होणार करोडपतीच्या मंचावर काजोलनं अनेक किस्से सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की काजोल म्हणते, 'मला बॉलिवूड फिल्म  इंडस्‍ट्रीमध्ये कधीच यायचे नव्हते. मी असा विचार करत होते की मी एक नोकरी आणि मला महिन्याला पगार मिळेल. ' हे ऐकल्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडकर म्हणताता, 'बरं झालं तुम्ही नोकरी केली नाही. जर तुम्ही नोकरी केली असती तर आम्हाला तुमचे चित्रपट बघता आले नसते.  ' यावर तनुजा म्हणतात, 'तिने जिथे नोकरी केली असती त्या ऑफिसमधील लोकांचा विचार करा.' तनुजा यांच्या या वाक्यानंतर प्रेक्षकांना हसू अनावर झाले. मुंबईतील 'एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर' (ADAPT)  या संस्थेसाठी या दोघी 'कोण होणार करोडपती' हा खेळ खेळणार आहेत.






काजोलनं 1992 मध्ये रिलीज झालेल्या  ‘बेखुदी’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. काही दिवसांपूर्वी काजोलचा  ‘त्रिभंगा’ हा चित्रपट  नेटफ्लिक्‍सवर प्रदर्शित झाला होता.  लवकरच काजोलचा   ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची ऑक्टोबरमध्ये घोषणा करण्यात आली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :