Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यश-नेहा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. नेहा-यशचा सुखी संसार नुकताच सुरू झाला आहे. अशातच विश्वजित काका मालिकेतून 21 दिवसांसाठी ब्रेक घेणार आहेत. मालिकेतून ब्रेक घेऊन विश्वजित काका 'कोल्हापूर ते कश्मीर लेह लडाख' सफर करणार आहेत. 


'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. आता मालिकेत यश आणि नेहाचा संसार खुलू लागलेला पाहायला मिळत आहे. अशातच मालिकेतील विश्वजित काका 21 दिवसांसाठी मालिकेतून ब्रेक घेणार आहेत. 






‘कोल्हापूर ते कश्मीर लेह लडाख’ सफर करणार 


'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत विश्वजित चौधरी हे पात्र आनंद काळे साकारत आहे. या मालिकेमुळे आनंद काळे यांना वेगळी ओळख मिळाली आहे. पण आता आनंद काळे काही दिवसांसाठी या मालिकेतून ब्रेक घेणार आहेत. ‘कोल्हापूर ते कश्मीर लेह लडाख’ अशी सफर आनंद काळे बाईकवरुन करणार आहेत. त्यामुळेच त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. आनंद काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. 


श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.


संबंधित बातम्या


Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहा जिंकली 100 कोटींचं डिल; सिम्मीची होणार फजिती


Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत निखिल राजेशिर्के साकारणार नेहाच्या पहिल्या नवऱ्याची भूमिका