सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा (2019) विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला आहे. यंदाचं हे 54 वं गौरव पदक आहे. मागील 53 वर्षांपासून हा नाट्यक्षेत्रातील मानाचा मानला जाणार पुरस्कार वितरीत केला जात आहे. 5 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी याच्या हस्ते सांगलीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
रोहिणी हट्टंगडी अनेक वर्षांपासून रंगभूमी, चित्रपट, मालिकामध्ये काम करत आहेत. 49 वर्षांपासून रोहिणी अनेक भाषांमधील मालिका, चित्रपटात काम करत आहेत. रिचर्ड
अॅटनबरो निर्मित 'गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबाच्या भूमिकेमुळे या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलाकाराला विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. विष्णुदास भावे गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि 25 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. आतापर्यत छोटा गंधर्व, प्र के अत्रे, दुर्गा खोटे, लक्ष्मणराव देशपांडे, ग दि माडगूळकर, निळू फुले , श्रीराम लागू या दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म 11 एप्रिल 1955 रोजी दिल्ली येथे झाला. वडिलांचे नाव अनंत मोरेश्वर ओक तर आईचे नाव निर्मला. त्यांच्या अभिनयाची सुरुवात पुण्याच्या भावे स्कूलपासून झाली. तिथे झालेल्या नाटकांत, अनेक नाट्यस्पर्धांत आणि औद्योगिक आस्थापने आयोजित करत असलेल्या नाट्यप्रयोगांत त्या भाग घेत राहिल्या. त्यांचे वडील, आई आणि भाऊ हे तिघेही नट होते. त्या सगळ्यांनीच गावगुंड या मराठी नाटकात भूमिका केली होती.
हट्टंगडी दाम्पत्याने कलाश्रय' ही नाट्याभ्यास करणारी व प्रयोगशालतला प्रोत्साहन देणारी सस्था स्थापन केलेली आहे. त्या संस्थेतर्फे त्यांनी वाडा, भवानी आईचा', 'अपराजिता (एकपात्री प्रयोग) अशा नाटकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. मालिकांतूनही त्या दिसतात. अनेक नाटकांतून आणि चित्रपटांतून भूमिका केल्या. त्याच्या चित्रपटात सहा तेलुगू चित्रपट आहेत. त्याशिवाय हिंदी, मराठी, दूरदर्शन, मालिकामध्येही रोहिणी यांनी भूमिका साकारल्या आहेत.