मुंबई : बिग बॉस-13 शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बिग बॉसचा प्रत्येक सीजन बिग बॉसमधील स्पर्धक, शो फॉरमॅट आणि शोचा होस्ट सलमान खान अशा कारणांवरुन चर्चेत राहिला आहे. यंदाच्या सीजनमध्ये लव-जिहादला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप महाराष्ट्र करणी सेनेनं केला आहे.


बिग बॉसच्या यंदाच्या सीजनमध्ये भारतीय संस्कृतीविरोधी कृत्य केलं जात असल्याचा आरोप आहे. यावरुन संपूर्ण वाद सुरु झाला आहे. त्यामुळे काही हिंदुत्ववादी संघटनांनी बिग बॉस विरोधात मोर्चा उघडला आहे. महाराष्ट्र करणी सेना अध्यक्ष अजय सिंह यांनी तर बिग बॉस सेट जाळून खाक करु अशी धमकी दिली आहे.


करणी सेनेसोबत इतरही हिंदूत्ववादी संघटना आणि युवक बिग बॉसविरोधात उभे ठाकले आहेत. सोशल मीडियावर माहिती प्रसारण मंत्रालय आणि राजकीय नेत्यांना टॅग करुन बिग बॉसच्या निर्मात्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.


काय आहे वाद?


बिग बॉस-13 च्या फॉरमॅटवरून हा वाद सुरु झाला आहे. यंदाच्या शो फॉरमॅटनुसार स्पर्धक पुरुष आणि महिला जोडी एकत्र असणार आहे. तसेच दोघांना एकाच बेडवर झोपावं लागत असून बेड फ्रेंड फॉरेव्हर असं त्याला नाव देण्यात आलं. यावरुन वातारवरण इतकं तापलं सलमान खानला पाकिस्तानला पाठवण्याची धमकी करणी सेनेनं देऊन टाकली. विरोध करणाऱ्या सर्व संघटना येत्या 11 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजत सलमान खानच्या घराबाहेर आंदोलन करणार आहेत. तसेच बिग शो बंद करण्याची मागणी करणार आहेत.


VIDEO | Bigg Boss Marathi 2 | 17 लाख रुपये कुठे खर्च करणार?, 'बिग बॉस मराठी 2'चा विजेता शिव ठाकरे म्हणतो..