Series Release In August 2022 : ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक दिवसागणिक नवीन वेब सिरीज किंवा चित्रपटाची घोषणा किंवा रिलीज होत आहे. यासोबत आम्ही तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये रिलीज होणार्‍या काही वेबसिरीजबद्दल सांगत आहोत. ज्या पाहताना तुमची झोप उडेल. चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या वेबसीरिज...


महाराणी 2 (Maharani 2) : 25 ऑगस्ट (Sonyliv)


हुमा कुरेशी स्टारर (Huma Qureshi) पॉलिटिकल ड्रामा 'महाराणी'चा दुसरा सीझन आज रिलीज झाला. ही वेबसीरिज एक काल्पनिक कथेवर आधारित आहे. मात्र याची कथा 1990 च्या दशकात बिहारमधील राजकीय गोंधळापासून प्रेरित आहे. जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यांनी त्यांची पत्नी राबडी देवी यांना उत्तराधिकारी बनवले होते. शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये हुमा (Huma Qureshi) राणी भारतीची मुख्य भूमिका साकारत आहे. भीमा भारती (सोहम शाहने साकारलेली) तुरुंगातून बाहेर पडतो आणि आपल्याच पत्नीशी तो कसा सत्तासंघर्ष हे आपल्याला यात पाहायला मिळणार आहे.


'क्रिमिनल जस्टिस' (Criminal Justice) 3: 26 ऑगस्ट (Disney Plus Hotstar)


'क्रिमिनल जस्टिस' हा ओटीटी स्पेसमध्ये सर्वाधिक आवडला जाणारा भारतीय शो आहे. आगामी सीझनमध्ये पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) वकील माधव मिश्राच्या भूमिकेत दिसणार आहे. जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण प्रसंगाचा सामना करताना आपल्याला यात दिसणार आहे. 


दिल्ली क्राईम (Delhi Crime) 2: 26 ऑगस्ट (Netflix)


या यादीत तिसरा क्रमांक आहे तो 'दिल्ली क्राइम सीजन टू'. ही एक पोलीस ड्रामा सिरीज आहे. रिची मेहता दिग्दर्शित मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये 2012 च्या दिल्ली सामूहिक बलात्काराची कथा सांगण्यात आली आहे. ज्याने संसदेला गुन्हेगारी कायदा (सुधारणा) कायदा, 2013 (निर्भया कायदा) मंजूर करण्यास प्रवृत्त केले. ज्यात लैंगिक गुन्ह्यांसंदर्भात भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा कायदा  (India Evidence Act) आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यांच्या तरतुदी आहेत. शोच्या पहिल्या सीझनला सर्वोत्कृष्ट नाटक मालिकेचा एमी पुरस्कार मिळाला. शोच्या सीझन 2 मध्ये शेफाली शाह, रसिका दुग्गल, राजेश तैलंग, आदिल हुसैन, अनुराग अरोरा, यशस्विनी दायमा, सिद्धार्थ भारद्वाज, गोपाल दत्त, डेन्झेल दिसणार आहेत.


हाऊस ऑफ द ड्रॅगन (House of the Dragon) : 29 ऑगस्ट -(Disney Plus Hotstar)


जॉर्ज आरआर मार्टिन यांच्या कादंबरीवर आधारित ब्लॉकबस्टर मालिका 'गेम ऑफ थ्रोन्स'चा प्रीक्वल 29 ऑगस्ट रोजी दुसऱ्या एपिसोडचे स्ट्रीमिंग केले जाणार आहे. 'हाऊस ऑफ ड्रॅगन्स' मध्ये 'गेम ऑफ थ्रोन्स' कथेच्या 200 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगण्यात आली आहे. यूएस आणि युरोपमध्ये HBO आणि HBO Max वर प्रीमियर झाल्यानंतर या सीरिजच्या पहिल्या भागाने 9.99 मिलियन दर्शकांना आकर्षित केले आहे.