Sapna Choudhary : प्रसिद्ध डान्सर, अभिनेत्री सपना चौधरी (Sapna Choudhary) विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. लखनौ कोर्टाने सपना चौधरीला अटक करून, कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. सपना चौधरीवर डान्स शोच्या नावाखाली लाखो रुपये जमा केल्याचा आणि कार्यक्रम न करता पैसे हडप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. सदर प्रकरणात 13 ऑक्टोबर 2018 रोजी आशियाना पोलिस स्टेशनमध्ये सपना चौधरी विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.


नृत्याचा कार्यक्रम रद्द केल्यानंतरही, तिकीटाचे पैसे परत न केल्याच्या या 4 वर्ष जुन्या प्रकरणाच्या सुनावणी वेळी न्यायालयात हजर न राहिल्यामुळे सपना विरोधात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. याप्रकरणी 10 मे रोजी सपनाने आत्मसमर्पण करून अंतरिम जामीन घेतला होता. 8 जून रोजी सपनाचा जामीनही सशर्त मंजूर करण्यात आला. सोमवारी या प्रकरणी सुनावणी होती. मात्र, सपना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यानंतर आता न्यायालयाने तिच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे.


नेमकं प्रकरण काय?


13 ऑक्टोबर 2018 रोजी आशियाना पोलिस स्टेशन चौकीचे उपनिरीक्षक फिरोज खान यांनी सपना चौधरी, रत्नाकर उपाध्याय, अमित पांडे, इबाद अली, नवीन शर्मा आणि जुनैद अहमद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 10 या वेळेत सपनासह इतर कलाकारांचा कार्यक्रम स्मृती उपवनमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रति व्यक्ती तिकिटासाठी तीनशे रुपये आकारले जात होते. मात्र, रात्री 10 वाजेपर्यंत सपना चौधरी न आल्याने लोकांनीही गोंधळ घातला. यानंतर त्यांच्या विरोधात तकार दाखल करण्यात आली होती.


फसवणुकीची तक्रार दाखल


या तक्रारीत म्हटले गेले होते की, लखनौच्या स्मृती उपवनमध्ये सपना चौधरीचा एक नृत्याचा कार्यक्रम होणार होता, त्यासाठी हजारो तिकिटेही विकली गेली होती. सपना चौधरीला आगाऊ रक्कमही देण्यात आली होती. पण, सपना कार्यक्रमाला पोहोचली नाही, त्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला. या कार्यक्रमासाठी सपनाने घेतलेले पैसेही आयोजकांना परत केले नाहीत. त्यामुळेच तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सपना चौधरी विरोधातील ही केस गेल्या 4 वर्षांपासून सुरु आहे. सदर प्रकरणात तिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीसाठी सपना हजर न राहिल्यामुळे तिच्या विरोधात अटक अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.


हेही वाचा :


सपना चौधरीची बोल्ड स्टाईल, साडीमधले फोटो झाले व्हायरल!


Fat to Fit : एकेकाळी वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झालेली Sapna Choudhary; आता फिटनेसमध्ये बड्या अभिनेत्रींना देतेय टक्कर