Top 9 TV Actress : छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री (TV Actress) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहेत. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये कायमच रडारड पाहायला मिळते, असं म्हटलं जातं. टीव्ही सुंदरींनी नुसतं रडून मालिकांना चांगला टीआरपी मिळवून दिला आहे. निर्मात्यांनाही त्यांनी भुरळ पाडली आहे. या यादीत रुपाली गांगुली (Rupali Ganguly) ते हिना खानपर्यंत (Hina Khan) अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.


बॉलिवूड अभिनेत्रींची कायमच चर्चा होत असते. पण मालिकाविश्व गाजवणाऱ्या अभिनेत्रीही एकापेक्षा एक आहेत. आजच्या घडीला छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांच्या अभिनयाचंही नेहमी कौतुक होत असतं. मालिकाविश्व गाजवणाऱ्या अभिनेत्रींची चर्चा होते तेव्हा अंकिता लोखंडे, निया शर्मा, हिना खान या अभिनेत्रींचा विषय निघतोच. 


1. रुपाली गांगुली (Rupali Ganguly)


'अनुपमा' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रुपाली गांगुली घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेतील रुपालीच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आहे. या मालिकेत अनेकदा ती रडतानाच दिसून आली आहे. त्याचा टीआरपीलाही फायदा झाला आहे.


2. शिवांगी जोशी (Shivangi Joshi)


'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत शिवांगी जोशीने काम केलं आहे. या मालिकेत तिने नायरा हे पात्र साकारलं होतं. तिचे अनेक सीन्स हे रडतानाचेच होते. 


3. मौनी रॉय (Mouni Roy)


मौनी रॉयच्या 'नागिन' मालिकेचं खूप कौतुक झालं आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या कार्यक्रमाने धमाका केला आहे. मौनीचे भावनिक सीन प्रेक्षकांना रडायला भाग पाडतात.


4. देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee)


'साथ निभाना साथिया' या मालिकेत देवोलीना भट्टाचार्जीने एका सरळ साध्या मुलीचे पात्र साकारले होते. या मालिकेत तिचे अनेक इमोशनल सीन्स होते. 


5. हिना खान (Hina Khan)


'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमुळे हिना खानला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेत तिने साकारलेली अक्षराची भूमिका चांगलीच गाजली.


6. सुंबुल तौकीर खान (Sumbul Tauqeer Khan)


सुंबुल तौकीर खान इमली या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेच्या माध्यमातून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.


7. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)


अंकिता लोखंडेला 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. ही मालिका आणि अंकिता लोखंडेला प्रेक्षक कधीही विसरू शकत नाहीत.


8. सृष्टी झा (Sriti Jha)


सृष्टी झा 'कुमकुम भाग्य' या मालिकेत दिसली आहे. या मालिकेत तिने साकारलेली प्रज्ञाची भूमिका चांगलीच गाजली आहे. 


9. सारा खान (Sara Khan)


बिदाई या मालिकेच्या माध्यमातून सारा खान घराघरांत पोहोचली. या मालिकेत सारा अनेकदा मेलो ड्रामावाल्या दृश्यांत दिसून आली आहे. 


संबंधित बातम्या


Marathi Serials : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' महाराष्ट्रात नंबर 1 मालिका; जाणून घ्या TRP Report