Nivedita Mazi Tai : मराठी मालिकाविश्वात (Marathi Serials) गेल्या काही दिवसांपासून अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अशातच आता 'निवेदिता माझी ताई' (Nivedita Mazi Tai) ही मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'निवेदिता माई ताई' मालिकेचा प्रोमो आऊट! (Nivedita Mazi Tai Promo Out)


'निवेदिता माई ताई' या मालिकेचा प्रोमो आता आऊट झाला आहे. या मालिकेतून एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशोक फळदेसाई आणि एताशा संझगिरी ही जोडी या नव्या मालिकेतून आपल्या भेटीस येते आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या अशोक आणि एताशा यांनी याआधीच्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली आहे. 


निवेदिता आणि यशोधनची जोडी छोट्या पडद्यावर आणणार रंगत






आता नव्या मालिकेतून ते प्रेक्षकांचे मनोरंजन कशा प्रकारे करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. यशोधन आणि निवेदिता ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे आहेत. पण या मालिकेत त्या दोघांबरोबर एक लहानगा मुलगा दिसणार आहे. रुद्रांश चोंडेकर असे त्याचे नाव असून तो असीम या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. असीम हा निवेदिताचा लहान भाऊ. आता निवेदिता आणि यशोधन यांची जोडी छोट्या पडद्यावर किती रंगत आणते, हे आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल. 
                   
'निवेदिता माझी ताई' या मालिकेचा विषयही तितकाच आगळावेगळा आहे. अभिनेता अशोक फळदेसाई आपल्या प्रॉमिसिंग अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असेल. तसेच एताशा संझगिरीनेही याआधी काही मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे आणि आता या मालिकेत दोघेही नव्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतील. मालिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. निवेदिता आणि यशोधन  यांच्या नव्या वेषभूषेची चर्चा नक्कीच रंगणार आहे.  


भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोड गोष्ट 


भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोड गोष्ट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. आता असीम आणि निवेदिता या भावा-बहिणीचे अनोखे नाते कशाप्रकरचे असेल हे मालिकेतच आपल्याला पाहायला मिळेल. मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संबंधित बातम्या


Premachi Goshta: थाटात पार पडणार मुक्ता आणि सागरचा संगीत सोहळा; 'हे' कलाकार लावणार हजेरी