Drashti Dhami Pregnancy : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दृष्टी धामीने गूड न्यूज दिली आहे. 'मधुबाला' फेम अभिनेत्री दृष्टी धामीच्या घरी चिमुकल्याचं बाळाचं आगमन झालं आहे. तिने लग्नाच्या 9 वर्षानंतर पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दृष्टी तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. आता तिने सोशल मीडियावर बाळाच्या स्वागताची घोषणा केली आहे. पहिल्या बाळाच्या जन्माबाबत सोशल मीडियावर अधिकृत घोषणा करताना दृष्टी धामीने एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. दृष्टीने बाळाची घोषणा करताच तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
दृष्टि धामी बनली आई
छोट्या पडद्यावरील टीव्ही मालिका मधुबाला प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली होती. या मालिकेतील मुख्य कलाकार अभिनेता विवियन डिसेना आणि अभिनेत्री दृष्टी धामी यांना प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. या मालिकेतून दृष्टी धामीने चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली. दृष्टी धामीने अलिकडे प्रेग्नेंसीची घोषणा केल्यावर ती चर्चेत आली होती. आता दृष्टीने बाळाच्या आगमनाची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दृष्टीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं आहे की, तिच्या घरी गोंडस चिमुकलीचं आगमन झालं आहे.
चिमुकलीच्या आगमनासाठी शेअर केली खास पोस्ट
अभिनेत्री दृष्टी धामीने मुलीच्या जन्माची गोड बातमी शेअर करताना एक फोटो पोस्ट केला आहे, "ज्यामध्ये लिहिलं, थेट स्वर्गातून तुमच्या हृदयात, एक नवीन जीवन, एक नवीन सुरुवात, ती आलीय..."