Aabhalmaya : ज्या मालिकेमुळे छोट्या पडद्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती मालिका म्हणजे आभाळमाया.. आभाळमाया या मालिकेला आता 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 25 वर्षांपूर्वी  आभाळमाया (Aabhalmaya) ही मालिका तत्कालीन अल्फा मराठी या वाहिनीवर प्रसारित झाली. आशयघन कथा, दिग्गज कलाकारांची फौज आणि लेखणीची जादू अशा सगळ्याच कारणांमुळे आभाळमाया ही आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. अगदी मालिकेचं शीर्षकगीतही आजही प्रत्येकाच्या तोंडावर असतं. 


नुकतच या मालिकेला 25 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. मालिकेच्या टीमसोबत मुग्धा यांनी एक फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोला दिलेल्या कॅप्शननेही साऱ्यांचं आठवणी पुन्हा एकदा जागल्या आहेत.                                                                                              


'ह्या मालिकेत काम केलं नाही...'


मुग्धा यांनी म्हटलं की, 25 वर्षांपूर्वी आभाळमाया ही मराठी भाषेतली खाजगी वाहिनी वरची पहिली दैनंदिन मालिका प्रसारित झाली.  त्याकाळी साधारण ह्या मालिकेत काम केलं नाही असा एकही कलाकार उभ्या इंडस्ट्री मध्ये नसावा. पहिलं पर्व सुमारे 468 भागाचं आणि दुसरं सुमारे 300 भागाचं होतं. 


'आभाळमाया'नं काय दिलं?


मुग्धा यांनी पुढे म्हटलं की, आभाळमाया नं काय दिलं.. तर ओळख, अभिमानाने सांगावी अशी एक कायमस्वरुपी आठवण, पुढे अनेक कामं, एक सुसंस्कृत मित्रमंडळ आणि ज्याला ब्ल्यू प्रिंट म्हणावं अश्या एका मालिकेचा भाग असण्याचे भाग्य. आता गणितं बदलली आहेत त्यामुळे आता अश्या मालिका का होत नाहीत असं म्हणण्यात काही अर्थ नाही. आता व्यवसाय, अर्थकारण आणि प्रेक्षक सुद्धा बदलले आहेत. पण ह्या गंगेत पावन झालेले आम्ही अजूनही ह्या आठवणीत खूप खूप रमतो. तेव्हा ना टीआरपी होता ना लेखक दिग्दर्शकांवर इतकी बंधनं. पण काहीतरी नक्की होतं ज्यामुळे 25 वर्षानंतरही केवळ त्या एका नावासाठी आम्ही सगळे एकत्र येतो. ती एक बातमी होते. ते काय हे शोधून काढायला हवं.



ही बातमी वाचा : 


Anand Shinde : आनंद शिंदेंना 'राजकीय सूर' गवसणार? शरद पवारांची ताकद असलेल्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही