एक्स्प्लोर

महिला ज्योतिषाच्या तक्रारीनंतर टीव्ही अभिनेत्यावर मुंबईत बलात्काराचा गुन्हा

ऑक्टोबर 2016 मध्ये एका डेटिंग अॅप्लिकेशनद्वारे दोघांची भेट झाली. यानंतर दोघे चांगले मित्र बनले. आरोपीने एका दिवशी महिलेला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावलं.

मुंबई : मुंबईत एका टीव्ही अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला ज्योतिषाच्या तक्रारीनंतर अभिनेत्यावर मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली असून तपास सुरु आहे. लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. शिवाय आरोपीने बलात्काराचा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केलं आणि पैसे उकळले, असा दावाही महिलेने केला आहे. पोलिस स्टेशनमधील नोंद गुन्ह्यानुसार, ऑक्टोबर 2016 मध्ये एका डेटिंग अॅप्लिकेशनद्वारे दोघांची भेट झाली. यानंतर दोघे चांगले मित्र बनले. आरोपीने एका दिवशी महिलेला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावलं. यावेळी आरोपीने महिलेला लग्नाचं वचन दिलं. महिलेच्या आरोपानुसार, आरोपीने तिला नारळ पाणी प्यायला दिलं. ते प्यायल्यानंतर काही वेळाने तिला चक्कर आली. यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि मोबाईलवर त्याचा व्हिडीओही बनवला. लग्नासाठी दबाव टाकल्याने धमकी "या व्हिडीओद्वारे तो आपल्याला ब्लॅकमेल करुन पैसे उकळत होता. तरीही मी त्याला लग्नाबाबत विचारणा करत होते. पण तो दरवेळी दुर्लक्ष करायचा आणि पैशांची मागणी करायचा. काही दिवसांपूर्वी मी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला, तेव्हा धमकी देत म्हणाला की, तुला जे करायचं ते कर," असा दावा महिलेने केला आहे. आरोपीवर गुन्हा, तपास सुरु यानंतर महिलेने अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "आम्ही महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. आरोपीविरोधात बलात्कार, बळजबरीने पैसे उकळणं यासह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे."

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Mohini - Premachi Filmy Kahaani Marathi Serial Track: सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Pune Moshi Building Collapse: घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Harshit Rana Ruled Out of ODI Series : इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Maharashtra Farmers: आधीच पावसाची पाठ, त्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट; राज्यातील बळीराजा अस्मानी अन् सुलतानी संकाटात, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी रडकुंडीला 
आधीच पावसाची पाठ, त्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट; राज्यातील बळीराजा अस्मानी अन् सुलतानी संकाटात, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी रडकुंडीला 
Pune Crime News: नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चा पुन्हा रंगल्या; गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना खोचक टोला, म्हणाले, 'त्यांची थेट दिल्लीला...'
एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चा पुन्हा रंगल्या; गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना खोचक टोला, म्हणाले, 'त्यांची थेट दिल्लीला...'
Embed widget