Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा आणि मल्हार हे समोरासमोर येणार आहेत.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काही महिन्यांपूर्वी वैदेहीचा मृत्यू झाला. वैदेही ही मल्हारची पहिली पत्नी आणि स्वरा ऊर्फ स्वराज आई होती. वैदेहीच्या मृत्यूनंतर आता वैदेही सारख्या दिसणाऱ्या मंजुळाची काही दिवसांपूर्वी मालिकेत एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही मल्हारची मुलगी पिहुला गाणं शिकवण्यासाठी आली आहे. आता मल्हार आणि मंजुळा हे पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत.
तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही घराबाहेर जेवत आहे. ते पाहून मल्हार म्हणतो, 'तुम्ही घराबाहेर बसून का जेवताय बाई?' त्यानंतर मंजुळाच्या ताटात शिळं अन्न पाहुन मल्हार म्हणतो, 'हे तर शिळं अन्न आहे. तुम्ही पिहूच्या गुरु आहात तुम्हाला अशी वागणूक दिलेली मला चालणार नाही.' मंजुळाचा हात पकडून मल्हार तिला घरात घेऊन जातो. तेव्हा मल्हार आणि मंजुळा समोरासमोर येतात. मंजुळाचा चेहरा पाहिल्यानंतल मल्हार काय म्हणेल? हे पुढच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
पाहा प्रोमो:
तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे (Priya Marathe) ही साकारते आणि स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरनं साकरली होती. आता ऊर्मिला ही या मालिकेतील मंजुळा ही भूमिका साकारत आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: