Tuzech Mi Geet Gaat Aahe:

  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मल्हार हा मंजुळाचे गाणं ऐकून प्रभावित झाला आहे. 


'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही मनिका, पिहु, स्वराज आणि क्षमा यांच्या समोर गाणं गात आहे. मंजुळा गाणं गात असताना मल्हार येतो. मल्हार मंजुळाचे गाणं ऐकून प्रभावित होतो. तसेच प्रोमोमध्ये दिसत आहे की, क्षमा ही मंजुळाच्या गाण्याचं कौतुक करत आहे.


तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काही महिन्यांपूर्वी वैदेहीचा मृत्यू झाला. वैदेही ही मल्हारची पहिली पत्नी आणि स्वरा ऊर्फ स्वराज आई होती. वैदेहीच्या मृत्यूनंतर आता वैदेही सारख्या दिसणाऱ्या मंजुळाची काही दिवसांपूर्वी मालिकेत एन्ट्री झाली आहे. आता पिहुला गाणं शिकवण्याच्या बहाण्यानं मंजुळा ही मल्हार आणि मोनिका यांच्या घरात आली आहे. आता मंजुळा आणि मल्हार यांची भेट होईल का? स्वराज हा स्वरा आहे, हे मल्हारला समजेल का? या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.


पाहा प्रोमो






तुझेच मी गीत गात आहे मालिकेची स्टार कास्ट


तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar)  हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे (Priya Marathe) ही साकारते आणि स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरनं साकरली होती. आता ऊर्मिला ही या मालिकेतील मंजुळा ही भूमिका साकारत आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tuzech Mi Geet Gaat Aahe: मोनिकाचा स्वराज विषयीचा राग हजारो लोकांसमोर आला; 'तुझेच मी गीत गात आहे’ च्या प्रोमोनं वेधलं लक्ष